पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व स्तरातील लोकांना ‘मेरा पहला वोट देश के लिए’ या मोहिमेचा संदेश नवमतदारांमध्ये पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.
पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘मेरा पहला वोट देश के लिए’ ही मोहीम सुरू झाली आहे. युवा मतदारांना लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ‘मेरा पहला वोट देश के लिए’ हे गीत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी X हँडलवर शेअर केले आणि सर्वांना ते शेअर करण्याचे आवाहन केले.
त्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले;
“आपण आपली निवडणूक प्रक्रिया आणखी समावेशक करूया. सर्व स्तरातील लोकांनी स्वत:च्या शैलीत, नवमतदारांपर्यंत हा संदेश पोहोचवावा, असे आवाहन मी करतो - ‘मेरा पहला वोट देश के लिए’
Let us make our electoral process even more participative. I call upon people from all walks of life to spread the message, in their own style, among first time voters - #MeraPehlaVoteDeshKeLiye! https://t.co/LTSdDV5Bkf
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2024