
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंती उत्सवानिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण करण्यात आले. जैन आचार्यांच्या सन्मानार्थ अनावरण करण्यात आलेल्या पुतळ्याला ‘स्टॅच्यु ऑफ पीस’ असे नाव देण्यात आले आहे. 151 इंच उंचीचा पुतळा अष्टधातूपासून तयार करण्यात आला आहे, यात तांब्याचे प्रमाण जास्त आहे आणि विजय वल्लभ साधना केंद्र, जेतापूर, पाली, राजस्थान येथे उभारण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी यावेळी जैनाचार्य आणि उपस्थित धर्मगुरूंना अभिवादन केले. सरदार वल्लभ भाई पटेल आणि जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज या दोन वल्लभ नावाच्या व्यक्तींचा , सरदार वल्लभ भाई पटेल आणि जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांचा उल्लेख करुन पंतप्रधान म्हणाले, सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा- ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’चे आणि आता जैनाचार्च श्री विजय वल्लभ यांच्या ‘स्टॅच्यु ऑफ पीस’ चे अनावरण करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. .
‘व्होकल फॉर लोकलवर’ भर देताना पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यलढ्यावेळी ज्याप्रमाणे घडले होते तसेच धर्मगुरुंनी आत्मनिर्भरतेचा संदेश सर्वदूर पोहचवा, अशी विनंती केली. दिवाळीच्या सणात देशाने स्थानिक उत्पादनांना दिलेला पाठिंबा उत्साही आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, भारताने जगाला नेहमीच शांती, अहिंसा आणि मैत्रीचा मार्ग दाखवला आहे. अशाच मार्गदर्शनासाठी आज जग भारताकडे पाहत आहे. जर, तुम्ही भारताचा इतिहास पाहिला तर, ज्या ज्या वेळी आवश्यकता निर्माण झाली त्यावेळी समाजात काही संतांचा उदय झाला, आचार्य विजय वल्लभ असेच एक संत होते. जैनाचार्य यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांचा उल्लेख करुन पंतप्रधानांनी शैक्षणिक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर केल्याबद्दल प्रशंसा केली, जैनाचार्यानी ,भारतीय मुल्ये जोपासत पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश याठिकाणी अनेक संस्था उभा केल्या आणि या संस्थांमधून अनेक उद्योजक, न्यायाधीश, डॉक्टर आणि अभियंते तयार झाले आणि त्यांनी राष्ट्राची सेवा केली, असे पंतप्रधान म्हणाले.
या संस्थांनी महिलांसाठी केलेल्या शैक्षणिक कार्याचे देशावर ऋण आहेत , असे पंतप्रधान म्हणाले. या संस्थांनी कठीण काळात महिलांच्या शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. जैनाचार्यांनी मुलींसाठी अनेक संस्थांची स्थापना करुन महिलांना मुख्य प्रवाहात आणले. आचार्य विजय वल्लभ जी हे दयाळू, कनवाळू आणि सर्व जीवांवर प्रेम करणारे होते, त्यांच्या आशीर्वादाने पक्षी रुग्णालय आणि अनेक गोशाळा देशभर कार्यरत आहेत. या काही सामान्य संस्था नाहीत. या भारताचा आत्मा आणि भारतीय मुल्यांचे मुर्त स्वरुप आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी जैनाचार्यांच्या कार्याचा गौरव केला.
मेरा सौभाग्य है कि मुझे देश ने सरदार वल्लभ भाई पटेल की विश्व की सबसे ऊंची ‘स्टेचू ऑफ यूनिटी’ के लोकार्पण का अवसर दिया था,
— PMO India (@PMOIndia) November 16, 2020
और आज जैनाचार्य विजय वल्लभ जी की भी ‘स्टेचू ऑफ पीस’ के अनावरण का सौभाग्य मुझे मिल रहा है: PM
भारत ने हमेशा पूरे विश्व को, मानवता को, शांति, अहिंसा और बंधुत्व का मार्ग दिखाया है।
— PMO India (@PMOIndia) November 16, 2020
ये वो संदेश हैं जिनकी प्रेरणा विश्व को भारत से मिलती है।
इसी मार्गदर्शन के लिए दुनिया आज एक बार फिर भारत की ओर देख रही है: PM
भारत का इतिहास आप देखें तो आप महसूस करेंगे, जब भी भारत को आंतरिक प्रकाश की जरूरत हुई है, संत परंपरा से कोई न कोई सूर्य उदय हुआ है।
— PMO India (@PMOIndia) November 16, 2020
कोई न कोई बड़ा संत हर कालखंड में हमारे देश में रहा है, जिसने उस कालखंड को देखते हुए समाज को दिशा दी है।
आचार्य विजय वल्लभ जी ऐसे ही संत थे: PM
एक तरह से आचार्य विजयवल्लभ जी ने शिक्षा के क्षेत्र में भारत को आत्मनिर्भर बनाने का अभियान शुरू किया था।
— PMO India (@PMOIndia) November 16, 2020
उन्होंने पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र उत्तर प्रदेश जैसे कई राज्यों में भारतीय संस्कारों वाले बहुत से शिक्षण संस्थाओं की आधारशिला रखी: PM
आचार्य जी के ये शिक्षण संस्थान आज एक उपवन की तरह हैं।
— PMO India (@PMOIndia) November 16, 2020
सौ सालों से अधिक की इस यात्रा में कितने ही प्रतिभाशाली युवा इन संस्थानों से निकले हैं।
कितने ही उद्योगपतियों, न्यायाधीशों, डॉक्टर्स, और इंजीनियर्स ने इन संस्थानों से निकलकर देश के लिए अभूतपूर्व योगदान किया है: PM
स्त्री शिक्षा के क्षेत्र में इन संस्थानों ने जो योगदान दिया है, देश आज उसका ऋणि है।
— PMO India (@PMOIndia) November 16, 2020
उन्होंने उस कठिन समय में भी स्त्री शिक्षा की अलख जगाई।
अनेक बालिकाश्रम स्थापित करवाए, और महिलाओं को मुख्यधारा से जोड़ा: PM
आचार्य विजयवल्लभ जी का जीवन हर जीव के लिए दया, करुणा और प्रेम से ओत-प्रोत था।
— PMO India (@PMOIndia) November 16, 2020
उनके आशीर्वाद से आज जीवदया के लिए पक्षी हॉस्पिटल और अनेक गौशालाएं देश में चल रहीं हैं।
ये कोई सामान्य संस्थान नहीं हैं। ये भारत की भावना के अनुष्ठान हैं।
ये भारत और भारतीय मूल्यों की पहचान हैं: PM