अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुन्दजई यांनी आज डॉक्टर्स दिनानिमित्त केलेल्या ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे. या राजदूतांनी, भारतीय डॉक्टरसोबतचा आपला एक भावनिक अनुभव संगीतला आहे. मामुन्दजई एका डॉक्टरकडे उपचारांसाठी गेले होते, त्यावेळी, जेव्हा ते अफगाणिस्तानचे राजदूत असल्याचे डॉक्टरांना कळले, तेव्हा त्या डॉक्टरांनी ‘मी माझ्या बंधूकडून कसलेही पैसे घेणार नाही’ असे सांगत कोणतेही शुल्क आकारले नव्हते. विशेष म्हणजे मामुन्दजई यांनी हे ट्वीट हिंदीत केले आहे. राजदूतांनी सांगितलेल्या या अनुभवातून, भारत-अफगाणिस्तान सबंधांमधील स्नेहाचा दरवळ जाणवतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली आहे.
तसेच, याच ट्वीटवर कॉमेंट करतांना, एका व्यक्तीने मामुन्दजई यांना पंजाबजवळच्या हरीपूरा गावात येण्याचे आमंत्रण दिले आहे. तिथे आणि गुजरातमधील ऐतिहासिक ओळख असलेल्या हरीपूरा गावालाही भेट द्यावी, असे पंतप्रधानांनी या ट्वीट थ्रेड मध्ये म्हटले आहे.
आज राष्ट्रीय डॉक्टर्स दिन आहे.
आप @BalkaurDhillon के हरिपुरा भी जाइए और गुजरात के हरिपुरा भी जाइए, वो भी अपने आप में इतिहास समेटे हुए है। मेरे भारत के एक डॉक्टर के साथ का अपना अनुभव आपने जो शेयर किया है, वो भारत-अफगानिस्तान के रिश्तों की खुशबू की एक महक है। https://t.co/gnoWKI5iOh
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2021