पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमो भारत या प्रादेशिक वेगवान रेल्वे गाडीला झेंडा दाखवून रवाना केले तसेच त्यांनी या गाडीतून प्रवास देखील केला.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे;
“पंतप्रधान @narendramodi सध्या इतर सह-प्रवाशांसह नमो भारत प्रादेशिक वेगवान रेल्वेगाडीतून प्रवास करत आहेत आणि हे प्रवासी त्यांचे या प्रवासाचे अनुभव पंतप्रधानांसोबत सामायिक करत आहेत. रेल्वेची ही सेवा कशा प्रकारे सकारात्मक परिणाम घडवून आणेल याबाबत देखील हे सहप्रवासी पंतप्रधानांशी चर्चा करत आहेत.”
PM @narendramodi is on board the Regional Rapid Train Namo Bharat with co-passengers who are sharing their experiences, including on how this train service will have a positive impact. pic.twitter.com/pIsZ5vnXcM
— PMO India (@PMOIndia) October 20, 2023