Quoteपंतप्रधान 1500 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार

पंतप्रधान 15 जुलै 2021 रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते विविध  विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

सकाळी अकराच्या सुमाराला पंतप्रधान विविध सार्वजनिक प्रकल्प व कामांचे उद्घाटन करतील, ज्यात बीएचयूमधील 100  बेडचा एमसीएच विभाग , गोदौलिया येथील बहु स्तरीय  पार्किंग सुविधा , गंगा नदीवर पर्यटन विकासासाठी रो-रो सेवा  आणि वाराणसी गाझीपूर महामार्गावरील   तीन पदरी उड्डाणपुलाचा यात समावेश आहे.  सुमारे  744  कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे यावेळी उद्घाटन केले जाईल. तसेच सुमारे 839  कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची आणि सार्वजनिक कामांची पायाभरणी ते करणार आहेत. यामध्ये सेंटर  फॉर स्किल अँड टेक्निकल सपोर्ट ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी), जल जीवन मिशन अंतर्गत 143  ग्रामीण प्रकल्प आणि कार्खीयन मधील आंबा आणि भाजीपाला एकात्मिक  पॅक हाऊसचा यात समावेश आहे.

दुपारी 12:15 च्या सुमाराला पंतप्रधान जपानच्या मदतीने बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार आणि अधिवेशन केंद्र - रुद्राक्षचे  उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास ते बीएचयूच्या माता आणि  बाल आरोग्य विभागाची पाहणी करतील. कोविड सज्जतेचा आढावा घेण्यासाठी ते अधिकारी आणि वैद्यकीय व्यावसायिकांनाही भेटणार आहेत.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India's defence exports surge to record Rs 23,622 crore in 2024-25: Rajnath Singh

Media Coverage

India's defence exports surge to record Rs 23,622 crore in 2024-25: Rajnath Singh
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM reflects on Navratri's sacred journey with worship of Maa Ambe
April 02, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi today reflected on Navratri’s sacred journey with worship of Maa Ambe. Urging everyone to listen, he shared a prayer dedicated to the forms of Devi Maa.

In a post on X, he wrote:

“नवरात्रि में मां अम्बे की उपासना सभी भक्तों को भावविभोर कर देती है। देवी मां के स्वरूपों को समर्पित यह स्तुति अलौकिक अनुभूति देने वाली है। आप भी सुनिए…”