तेलंगणात आदीलाबाद येथे पंतप्रधान यांच्या हस्ते 56,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या प्रकल्पांचा उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी होणार
आदीलाबाद येथे ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणार असल्या अनेकविध प्रकल्पामुळे ऊर्जा क्षेत्राला प्रचंड प्रमाणावर चालना मिळणार
तेलंगणात संगारेड्डी इथे 6,800 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार
संगा रेड्डी मध्ये होत असलेल्या प्रकल्पां मध्ये रस्ते रेल्वे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासारख्या बहुविध महत्त्वाच्या क्षेत्रांचा अंतर्भाव असणार
हैदराबाद येथे नागरी हवाई वाहतूक संशोधन संघटनेचे (CARO) पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार
पंतप्रधानांच्या उपस्थितीत तामिळनाडूत कल्पक्कम येथे भारताच्या स्वदेशी नमुनेदार जलद ब्रीडर अणुभट्टीच्या कोअर लोडिंगला प्रारंभ
भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील हा एक ऐतिहासिक टप्पा म्हणून नोंद होईल
पंतप्रधान ओदिशात चंदीखोल येथे 19,600 कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील.
पंतप्रधान कोलकात्यात 15,400 कोटी रुपयांच्या अनेक संपर्कव्यवस्था प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
पंतप्रधान बेत्तियामध्ये सुमारे 8,700 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन करतील.
पंतप्रधान मुझफ्फरपूर - मोतिहारी एलपीजी पाइपलाइनचे उद्घाटन करतील आणि मोतिहारी येथे इंडियन ऑइलचा एलपीजी बाटलीभरणी प्रकल्प आणि साठवणूक टर्मिनलचे लोकार्पण करतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ते 6 मार्च 2024 दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ते 6 मार्च 2024 दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत

4 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता तेलंगणात आदीलाबाद येथे पंतप्रधानांच्या हस्ते 56 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेकविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी होणार आहे.  त्यानंतर दुपारी साधारण 3:30 वाजता पंतप्रधान तामिळनाडूत कल्पक्कम येथे ‘भाविनी’ ला भेट देतील.

5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता हैदराबाद इथे पंतप्रधानांच्या हस्ते नागरी हवाई वाहतूक संशोधन संघटना केंद्राचे (CARO) राष्ट्रार्पण करतील. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते तेलंगणात सांगारेड्डी येथे 6,800  कोटी रुपये किमतीच्या अनेकविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान ओदिशात जयपुर मधल्या चंदीखोल इथे 19,600 कोटी रुपये किमतीच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

6 मार्च रोजी सकाळी 10:15  वाजता पंतप्रधानांच्या हस्ते कोलकात्यात 15,400 कोटी रुपयांच्या संपर्क व्यवस्था प्रकल्पांचा अनेकविध उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे त्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान बिहारमध्ये बेत्तिया येथे 8,700  कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधानांची आदिलाबाद भेट

आदिलाबाद, तेलंगणा येथील सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान 56,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वीज, रेल्वे आणि रस्ते क्षेत्राशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. प्रकल्पांचे मुख्य लक्ष्य ऊर्जा क्षेत्र असेल.

पंतप्रधान देशभरातील ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान तेलंगणात पेड्डापल्ली येथे एनटीपीसीच्या 800 मेगावॅट (युनिट-2) तेलंगणा सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे राष्ट्रार्पण करतील. सूक्ष्म -सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा प्रकल्प तेलंगणाला 85% वीज पुरवठा करेल आणि याची वीज निर्मिती कार्यक्षमता भारतातील NTPC च्या सर्व उर्जा स्थानकांपैकी सर्वाधिक म्हणजे अंदाजे 42% एवढी असेल. या प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती.

पंतप्रधान झारखंडमधील चतरा येथील उत्तर करणपुरा सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा 660 मेगावॅट (युनिट-2) चे देखील राष्ट्रार्पण करतील. हा देशातील पहिला सुपरक्रिटिकल औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे ज्यात पारंपारिक वातानुकुलित कंडेन्सरच्या तुलनेत पाण्याचा वापर 1/3 पर्यंत कमी होईल अशा प्रकारे याची मांडणी भव्य प्रमाणात वातानुकुलित कंडेन्सर (ACC) ने केली आहे, या प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला होता.

छत्तीसगढमधील सिपत, बिलासपूर येथे फ्लाय ॲश तंत्रज्ञानावर आधारित हलक्या वजनाचा एकत्रिकरण प्रकल्पाचे तसेच उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील ग्रीन हायड्रोजन प्लांटच्या एसटीपी पाणी प्रकल्पाचे राष्ट्रार्पण देखील पंतप्रधान करतील.

त्यानंतर, पंतप्रधान उत्तर प्रदेशात सोनभद्र येथे सिंगरौली सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या टप्पा-III (2x800 MW); छत्तीसगडमधील रायगड येथे लारा मधल्या फ्लू गॅस CO2 ते 4G इथेनॉल प्रकल्प; आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे सिंहाद्री इथल्या समुद्राचे पाणी ते ग्रीन हायड्रोजन प्लांट आणि छत्तीसगडमधील कोरबा येथे फ्लाय ऍश आधारित एकत्रित FALG प्लांटची पायाभरणी करतील.

पंतप्रधान सात प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि भारतीय ऊर्जा वीजवहन महामंडळाच्या एका प्रकल्पाचीही पायाभरणी करतील. राष्ट्रीय वीजवहन मजबूत करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

पंतप्रधान राजस्थानात जैसलमेर येथे राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळाच्या (NHPC) 380 MW सौर प्रकल्पाचे उद्घाटन करतील. प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 792 दशलक्ष युनिट हरित उर्जा निर्मिती केली जाईल.

पंतप्रधान उत्तर प्रदेशातील जालौन येथे बुंदेलखंड सौर ऊर्जा लिमिटेडच्या (बीएसयूएल) 1200 मेगावॅट जालौन सूक्ष्म बहु नवीकरणीय उर्जा शक्ती प्रांगणाची पायाभरणी करतील. या प्रांगणातून प्रतिवर्षी सुमारे 2400 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार आहे.

उत्तर प्रदेशातील जालौन आणि कानपूर देहात येथे सतलज जल विद्युत निगम (SJVN) च्या तीन सौर ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करतील. या प्रकल्पांची एकूण क्षमता 200 मेगावॅट आहे. या प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती. पंतप्रधान उत्तराखंडात उत्तरकाशी येथे संबंधित पारेषण मार्गिकेसह नैटवार मोरी जलविद्युत केंद्राचे उद्घाटन करतील. पंतप्रधान बिलासपूर, हिमाचल प्रदेश आणि धुबरी, आसाम येथे SJVN च्या दोन सौर प्रकल्पांची तसेच हिमाचल प्रदेशातील 382 मेगावॅटच्या सुन्नी धरण जलविद्युत प्रकल्पाचीही पायाभरणी करतील.

पंतप्रधान उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात तुस्कोच्या 600 मेगावॅटच्या ललितपूर सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करतील. या प्रकल्पातून प्रतिवर्षी 1200 दशलक्ष युनिट हरित उर्जा निर्माण होईल.

नवीकरणीय ऊर्जेतून 2500 मेगावॅट वीज बाहेर काढण्यासाठी रिन्यूच्या कोप्पल-नरेंद्र पारेषण योजनेचे उद्घाटन पंतप्रधान करतील. ही आंतरराज्य पारेषण योजना कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन आणि इंडिग्रीडच्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित इतर प्रकल्पांचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

ऊर्जा क्षेत्रासोबतच रस्ते आणि रेल्वे क्षेत्रातील प्रकल्पही या भेटीदरम्यान हाती घेण्यात येणार आहेत. पंतप्रधान नवीन विद्युतीकृत अंबारी - आदिलाबाद - पिंपळखुटी रेल्वे मार्ग राष्ट्राला अर्पण करतील. NH-353B आणि NH-163 द्वारे तेलंगणा आणि महाराष्ट्र तसेच तेलंगणा आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करतील.

पंतप्रधानांची हैदराबाद भेट

पंतप्रधान हैदराबाद येथील नागरी हवाई वाहतूक संशोधन संस्था (CARO) केंद्राचे राष्ट्रार्पण करतील. नागरी उड्डाण क्षेत्रातील संशोधन आणि विकास (R&D) क्रियान्वयानमध्ये संशोधन आणि विकास करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हैदराबाद मध्ये बेगमपेट विमानतळ येथे त्याची स्थापना केली आहे. यामागे, स्वदेशी आणि नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्यासाठी आंतर केंद्रीय आणि सहयोगी संशोधनाद्वारे विमानचालन समुदायासाठी जागतिक संशोधन मंच प्रदान करण्याचा हेतू आहे. 350 कोटींहून अधिक खर्च करून बांधलेली, ही अत्याधुनिक सुविधा पंचतारांकित गृह मानांकन आणि उर्जा संवर्धन बांधणी बिल्डिंग संहिता (ECBC) नियमांचे पालन करते.

भविष्यातील संशोधन आणि विकास उपक्रमांना पाठींबा देण्यासाठी CARO सर्वसमावेशक प्रयोगशाळा क्षमतांचा वापर करेल. हे क्रियान्वयन विश्लेषण आणि कार्यप्रदर्शन मापनासाठी माहिती संकलन विश्लेषण क्षमतांचा देखील लाभ घेईल. CARO मधील प्राथमिक R&D क्रियान्वयनामध्ये इतर घटकांसह हवाई क्षेत्र आणि विमानतळ संबंधित सुरक्षा, क्षमता आणि कार्यक्षमता सुधारणा कार्यक्रम, प्रमुख हवाई क्षेत्र आव्हाने, विमानतळ पायाभूत सुविधांच्या आव्हानांचा शोध, भविष्यातील हवाई क्षेत्र आणि विमानतळ गरजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित करणे या बाबींचा समावेश असेल

संगारेड्डी इथे पंतप्रधानांचे कार्यक्रम

पंतप्रधान 6,800 कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.  या प्रकल्पांमध्ये, रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासारख्या बहुविध प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.

पंतप्रधान, तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.  पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये, NH-161 च्या कांडी ते रामसनपल्ले या 40 किमी लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे.  हा प्रकल्प, इंदूर - हैदराबाद आर्थिक पट्ट्याचा (इकॉनॉमिक कॉरिडॉर) एक भाग आहे आणि यामुळे तेलंगण, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक अखंड तसेच  सुलभ होईल.  या टप्प्यामुळे हैदराबाद आणि नांदेड दरम्यानचा प्रवासाचा वेळही जवळपास 3 तासांनी कमी होईल.  NH-167 च्या  मिर्यालागुडा ते कोडाड भागातील 47 किमी लांबीच्या टप्प्याच्या, पेव्हर ब्लॉक बसवलेल्या अतिरिक्त भागासह दुपदरीकरणाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. दळणवळण व्यवस्थेतील या सुधारणेमुळे, या प्रदेशातील पर्यटन तसेच आर्थिक उलाढाल आणि उद्योगांना चालना मिळेल.

पुढे, पंतप्रधान NH-65 च्या पुणे-हैदराबाद विभागाच्या 29 किमी लांबीच्या सहा पदरीकरणासाठी पायाभरणी करतील.  या प्रकल्पामुळे तेलंगणातील प्रमुख औद्योगिक केंद्रांनाही, पतनचेरूजवळील पशाम्यलाराम औद्योगिक क्षेत्राप्रमाणे सुधारीत दळणवळण व्यवस्था मिळेल.

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान, रेल्वेस्थानकाच्या सहा नवीन  इमारतींसह सनथनगर - मौला अली रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे उद्घाटन करतील.  प्रकल्पाचा संपूर्ण 22  किलोमीटर लांब मार्ग, स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेसह कार्यान्वित करण्यात आला आहे आणि MMTS (मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस) टप्पा - II प्रकल्पाचा भाग म्हणून पूर्ण करण्यात आला आहे.  त्याचाच एक भाग म्हणून, फिरोजगुडा, सुचित्रा सेंटर, भूदेवी नगर, अम्मुगुडा, नेरेडमेट आणि मौला अली हाऊसिंग बोर्ड या सहा रेल्वे स्थानकांवर नवीन इमारती उभ्या राहिल्या आहेत.  दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामामुळे या विभागात प्रथमच, प्रवासी गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे इतर मोठ्या प्रमाणात क्षमता पूर्ण झालेल्या विभागांवरील भार कमी होऊन या प्रदेशातील गाड्यांचा वक्तशीरपणा आणि एकूण गती सुधारण्यास मदत होईल.

मौला अली-सनथनगर मार्गे घाटकेसर-लिंगमपल्ली या MMTS रेल्वे सेवेलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. या रेल्वे सेवेमुळे, हैदराबाद - सिकंदराबाद या जुळ्या शहरांमधील लोकप्रिय उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार, पहिल्यांदाच नवीन भागात होत आहे. यामुळे चेर्लापल्ली, मौला अली यांसारख्या, शहराच्या पूर्व भागातील नवीन क्षेत्रांना, जुळ्या शहरांच्या प्रदेशातील पश्चिम भागाशी जोडणे शक्य झाले आहे.  पूर्व भागाला जुळ्या शहरांच्या प्रदेशातील पश्चिम भागाशी जोडणारा सुरक्षित, जलद आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा मार्ग प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

पुढे, पंतप्रधान इंडियन ऑइल पारादीप-हैदराबाद उत्पादन वाहिनीचे उद्घाटन करतील.  4.5 MMTPA क्षमतेची 1212 किमी लांबीची ही वाहिनी,  ओदिशा (329 किमी), आंध्र प्रदेश (723 किमी) आणि तेलंगणा (160 किमी) या राज्यांमधून जाते. या वाहिनीमुळे, पेट्रोलियम उत्पादनाची, पारादीप तेलशुद्धीकरण प्रकल्प ते विशाखापट्टणम, अच्युतापुरम आणि विजयवाडा (आंध्र प्रदेशातील) आणि हैदराबादजवळील मलकापूर (तेलंगणामधील) येथील वितरण केंद्रांपर्यंत, सुरक्षित आणि किफायतशीर वाहतूक शक्य होईल.

कल्पक्कममध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रम

भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील ऐतिहासिक असा मैलाचा दगड म्हणून ठरणाऱ्या, कल्पक्कम, तामिळनाडू इथल्या 500 मेगावॅट क्षमतेच्या भारताच्या स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरच्या (PFBR) कोर लोडिंगचा (अणुभट्टीत इंधन भरण्याची प्रक्रिया) प्रारंभ, पंतप्रधानांच्या हस्ते  होईल.  हा PFBR,  BHAVINI (भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड) ने विकसित केला आहे.

अणुभट्टीच्या गाभ्यामध्ये कंट्रोल सब असेम्बली, ब्लँकेट सब असेम्ब्ली आणि इंधन सब असेम्ब्ली, असे यंत्राचे भाग  असतात.  कोर लोडिंग प्रक्रियेमध्ये, अणुभट्टी नियामक उप-असेंबली जोडणे, त्यानंतर ब्लँकेट सब-असेंबली आणि इंधन उप-असेंबली जोडणे यांचा समावेश होतो. यातूनच मग वीजनिर्मिती होते.

भारताने इंधनाचा पुनर्वापर करता येईल अशा व्यवस्थे सह तीन टप्प्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम स्वीकारला आहे.  PFBR हा आण्विक कार्यक्रमाचा दुसरा टप्पा आहे, ज्यात,  पहिल्या टप्प्यात वापरलेल्या इंधनावर पुनर्प्रक्रिया करुन ते FBR मध्ये इंधन म्हणून वापरले जाते.  या सोडियम शीतनक (थंड करणारा घटक) म्हणून वापरलेल्या पीएफबीआरचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते वापरलेल्या इंधनापेक्षा जास्त इंधन, तयार करू शकते. यामुळे, भविष्यातील जलद अणुभट्ट्यांसाठी इंधन पुरवठ्यामध्ये स्वावलंबन साध्य करण्यात मदत होईल.

अणुभट्टीतून निर्माण होणारा कमीत कमी आण्विक कचरा आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह, फास्ट ब्रिडर रिॲक्टर सुरक्षित, कार्यक्षम आणि स्वच्छ उर्जेचा स्रोत प्रदान करतील तसेच निव्वळ शून्याचे  उद्दिष्ट साध्य करण्यात योगदान देतील. अणुऊर्जा कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात थोरियमच्या वापराच्या दिशेने भारताचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. ही भट्टी कार्यान्वित झाल्यावर व्यावसायिक दृष्ट्या कार्यरत जलद अणुभट्टी असणारा भारत हा रशियानंतरचा दुसरा देश असेल.

पंतप्रधानांचे चांदिखोल येथील कार्यक्रम

चांदिखोल येथे पंतप्रधानांच्या हस्ते 19,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे. हे प्रकल्प तेल आणि वायू, रेल्वे, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग आणि अणुऊर्जा या क्षेत्रांशी संबंधित आहेत. 

पारादीप रिफायनरीतील  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मोनो इथिलीन ग्लायकोल प्रकल्पाचेही उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.  या प्रकल्पामुळे भारताचे आयात अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.  पंतप्रधान ओडिशातील पारादीप ते पश्चिम बंगालमधील हल्दिया या दरम्यानच्या 344 किमी लांबीच्या उत्पादन पाइपलाइनचे उद्घाटनही करतील.  भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आयात पायाभूत सुविधा सुधारण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान पारादीप येथे 0.6 MMTPA LPG आयात सुविधेचे उद्घाटन करतील.

या प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग-49 च्या सिंघारा ते बिंजाबहल विभागाच्या चौपदरीकरणाचे काम;  राष्ट्रीय महामार्ग-49 च्या बिंजाबहल ते तिलेबानी विभागाचे चौपदरीकरणाचे काम ;  राष्ट्रीय महामार्ग-18 च्या बालासोर - झारपोखरिया विभागाचे चौपदरीकरणाचे काम आणि राष्ट्रीय महामार्ग-16 च्या टांगी-भुवनेश्वर विभागाचे चौपदरीकरणाच्या कामाचे लोकार्पण केले जाईल.  चांदिखोल येथे  चांदिखोल - पारादीप विभागाच्या आठ पदरी कामाची पायाभरणीही  पंतप्रधान करणार आहेत.

आधुनिकीकरण आणि रेल्वे संपर्क सुविधा वाढवण्यावर भर देऊन रेल्वे मार्गाच्या जाळ्याचा विस्तार देखील केला जाणार आहे. पंतप्रधान, 162 किमी लांबीच्या बनसापाणी - दैतारी - टोमका - जाखापुरा रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित करतील.  हा रेल्वे मार्ग केवळ विद्यमान वाहतूक सुविधेची क्षमता वाढवणार नाही तर केओंझार जिल्ह्यातील लोह आणि मँगनीज धातूची जवळच्या बंदरांपर्यंत आणि पोलाद संयंत्रांपर्यंत कार्यक्षम वाहतूक देखील सुलभ बनवेल आणि याद्वारे प्रादेशिक आर्थिक विकासात लक्षणीय योगदान देईल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्याच्या उद्देशाने  कलिंग नगरमधील CONCOR कंटेनर डेपोचे उद्घाटन केले जाईल.  नार्ला येथे इलेक्ट्रिक लोको पीरियडिकल ओव्हरहॉलिंग वर्कशॉप, कांताबंजी येथील वॅगन पीरियडिकल ओव्हरहॉलिंग वर्कशॉप आणि बघुआपाल येथील देखभाल सुविधा केंद्राचे अद्ययावतीकरण या कामाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते केली जाईल.  या भेटीदरम्यान नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यासह इतर रेल्वे प्रकल्पांचे कामही हाती घेण्यात येणार आहेत.

पंतप्रधान ओडीशामधील IREL(I) लिमिटेडच्या सँड्स कॉम्प्लेक्समध्ये 5 MLD क्षमतेच्या समुद्री जल डिसॅलिनेशन अर्थात विलवणीकरण संयंत्राचे उद्घाटनही करणार आहेत. भाभा अणु संशोधन केंद्राने विकसित केलेल्या स्वदेशी डिसॅलिनेशन अर्थात विलवणीकरण तंत्रज्ञानाच्या फील्ड ऍप्लिकेशन्सचा एक भाग म्हणून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

पंतप्रधानांचे कोलकाता येथील कार्यक्रम

शहरी वाहतूक सुलभ करण्यासाठीचे पर्याय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून, कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान- एस्प्लेनेड मेट्रो विभाग, कवी सुभाष - हेमंता मुखोपाध्याय मेट्रो विभाग, तरातला - माजेरहाट मेट्रो विभाग (जोका- एस्प्लेनेड लाइनचा भाग) यांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. यासोबतच,  पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंत पुणे मेट्रो;  SN जंक्शन मेट्रो स्टेशन ते त्रिपुनिथुरा मेट्रो स्टेशन पर्यंत कोची मेट्रो रेल फेज I विस्तार प्रकल्प (फेज IB);  आग्रा मेट्रोचा ताज पूर्व गेट ते मनकामेश्वरपर्यंतचा मार्ग; आणि दिल्ली - मेरठ RRTS कॉरिडॉरचा दुहाई - मोदीनगर (उत्तर) विभाग यांचे  उद्घाटन देखील पंतप्रधान करणार आहेत. ते या विभागांवरील रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड मेट्रो-निगडी दरम्यानच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज 1 च्या विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

या प्रकल्पामुळे रस्त्यावरील रहदारी कमी करण्यात मदत होईल तसेच अखंड, सुलभ आणि आरामदायी संपर्क सुविधा उपलब्ध होईल.  कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान - एस्प्लेनेड मेट्रो विभागात असलेला बोगदा हा भारतातील कोणत्याही शक्तिशाली नदी खालून जाणारा पहिला वाहतूक बोगदा आहे.  हावडा मेट्रो स्टेशन हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे.  तसेच, माजेरहाट मेट्रो स्थानक ( उद्घाटन होत असलेल्या तरातळा - माजेरहाट मेट्रो विभागातील स्थानक ) हे रेल्वे मार्ग, फलाट आणि कालव्यावरील एक अद्वितीय उन्नत मेट्रो स्टेशन आहे.  आग्रा मेट्रोच्या विभागाच्या उद्घाटनामुळे ऐतिहासिक पर्यटन स्थळांशी संपर्क वाढेल.  प्रादेशिक जलद संक्रमण प्रणाली विभाग NCR मधील आर्थिक क्रियाकलापांना चालना देईल.

बेतिया येथे पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील बेतिया पश्चिम चंपारण जिल्ह्यात सुमारे 8700 कोटी रुपयांच्या रेल्वे रस्ते, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूशी संबंधित विविध पायाभूत सुविधा संबंधित प्रकल्पांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन करतील.

इंडियन ऑइलच्या 109 किमी लांबीच्या मुझफ्फरपूर-मोतिहारी एलपीजी पाइपलाइनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे बिहार राज्य आणि शेजारील देश नेपाळमध्ये स्वच्छ स्वयंपाक इंधनासाठी प्रवेश प्रदान करेल. पंतप्रधान मोतिहारी येथे इंडियन ऑइलचा एलपीजी बॉटलिंग प्लांट आणि स्टोरेज टर्मिनल समर्पित करतील. नवीन पाइपलाइन टर्मिनल नेपाळला पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीसाठी धोरणात्मक पुरवठा बिंदू म्हणून देखील काम करेल. हे उत्तर बिहारमधील 8 जिल्ह्यांना सेवा देईल. पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, गोपालगंज, सिवान, मुझफ्फरपूर, शेओहर, सीतामढी आणि मधुबनी, मोतिहारी येथील नवीन बॉटलिंग प्लांट मोतिहारी प्लांटशी संलग्न खाद्य बाजारांमध्ये पुरवठा साखळी सुरळीत करण्यात मदत करेल.

एनएच-28ए च्या पिप्रकोठी - मोतिहारी - रक्सौल विभागाच्या दोन लेनिंगसह रस्त्यांच्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत, ज्यात एनएच-104 च्या शेओहर-सीतामढी-विभागाच्या दोन लेनिंगचा समावेश आहे. NH-19 बायपासच्या बकरपूर हाट-माणिकपूर विभागाच्या चौपदरीकरणाच्या गंगा नदीवरील पाटणा येथे दिघा-सोनेपूर रेल्वे-कम-रोड पुलाच्या समांतर गंगा नदीवरील सहा लेन केबल ब्रिजच्या बांधकामासह प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत.

पंतप्रधान विविध रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान बापुधाम मोतिहारी-पिप्रहान पासून 62 किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, राष्ट्राला समर्पित करतील आणि ते नरकटियागंज-गौनाहा गेज परिवर्तनाचे उद्घाटन देखील करतील. पंतप्रधान 96 किमी लांबीच्या गोरखपूर कँट-वाल्मिकी नगर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण आणि बेतिया रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी करतील. पंतप्रधान नरकटियागंज - गौनाहा आणि रक्सौल - जोगबानी दरम्यान दोन नवीन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवतील.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi