Quoteरेणुकाजी धरण प्रकल्पाची पंतप्रधान करणार पायाभरणी- पंतप्रधानांच्या सहकारी संघराज्याच्या दृष्टीकोनाअंतर्गत सहा राज्यांना एकत्र आणून प्रकल्पाचे काम
Quoteदिल्लीच्या पाणीपुरवठ्यात भरीव वाढ होऊन प्रकल्प दिल्लीसाठी ठरणार लाभदायक
Quoteलुहरी टप्पा 1 आणि धौलसीध जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान करणार
Quoteसवरा-कुड्डू जलविद्युत प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
Quoteहिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या दुसऱ्या नाविन्यपूर्ण समारंभाचे पंतप्रधान अध्यक्षस्थान भूषवतील
Quoteहिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या दुसऱ्या नाविन्यपूर्ण समारंभाचे पंतप्रधान अध्यक्षस्थान भूषवतील
Quoteया परिषदेच्या माध्यमातून सुमारे 28,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करून या प्रदेशातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर 2021 रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील दौरा करणार आहेत. दुपारी 12 वाजता ते सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यापूर्वी सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या दुसऱ्या नाविन्यपूर्ण समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

देशात उपलब्ध असलेल्या अद्याप  वापरात न आणलेल्या  संसाधनांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यावर पंतप्रधानांनी सतत लक्ष केंद्रित केले आहे.
याबाबतीतील एक पाऊल म्हणजे हिमालयीन प्रदेशातील जलविद्युत क्षमतेचा योग्य वापर करणे.या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते  होणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन  आणि पायाभरणी हे या  दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल प्रतिबिंबित करते.

रेणुकाजी धरण प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. केंद्र सरकारने  हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, उत्तराखंड आणि दिल्ली या सहा राज्यांना एकत्रित आणून सुमारे तीन दशकांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प पंतप्रधानांच्या सहकार संघराज्यवादाच्या दृष्टीकोनातून शक्य झाला आहे. 40 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प सुमारे 7000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे.या प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे 500 दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा होणार असून दिल्लीसाठी हा प्रकल्प अत्यंत फायदेशीर ठरणार आहे

 

लुहरी टप्पा  1 जलविद्युत  प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. 210 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प सुमारे 1800 कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे. यामुळे वर्षाला 750 दशलक्ष युनिट्सहून अधिक वीजनिर्मिती होईल. आधुनिक आणि विश्वसनीय ग्रीडच्या आधारामुळे या  प्रदेशाच्या शेजारील राज्यांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे.

धौलसीध जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. हमीरपूर जिल्ह्यातील हा पहिला जलविद्युत प्रकल्प असून 66 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प सुमारे 680 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे वर्षाला 300 दशलक्ष युनिटपेक्षा जास्त वीजनिर्मिती होईल.


सवरा-कुड्डू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटनही  पंतप्रधान करणार आहेत. 111 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प सुमारे 2080 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात येणार आहे. यामुळे प्रतिवर्षी 380 दशलक्ष युनिटपेक्षा जास्त वीजनिर्मिती होईल आणि राज्याला वार्षिक 120 कोटी रुपयांचा महसूल मिळण्यास सहाय्य मिळेल.

पंतप्रधान दुसऱ्या  हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे अध्यक्षपदही भूषवतील. सुमारे 28,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करून या परिषदेच्या माध्यमातून या प्रदेशातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

 

 

  • Pradeep Kumar Gupta April 03, 2022

    namo namo
  • शिवकुमार गुप्ता January 14, 2022

    🙏🌷जय श्री सीताराम जी🌷🙏
  • SanJesH MeHtA January 11, 2022

    यदि आप भारतीय जनता पार्टी के समर्थक हैं और राष्ट्रवादी हैं व अपने संगठन को स्तम्भित करने में अपना भी अंशदान देना चाहते हैं और चाहते हैं कि हमारा देश यशश्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में आगे बढ़ता रहे तो आप भी #HamaraAppNaMoApp के माध्यम से #MicroDonation करें। आप इस माइक्रो डोनेशन के माध्यम से जंहा अपनी समर्पण निधि संगठन को देंगे वहीं,राष्ट्र की एकता और अखंडता को बनाये रखने हेतु भी सहयोग करेंगे। आप डोनेशन कैसे करें,इसके बारे में अच्छे से स्मझह सकते हैं। https://twitter.com/imVINAYAKTIWARI/status/1479906368832212993?t=TJ6vyOrtmDvK3dYPqqWjnw&s=19
  • Moiken D Modi January 09, 2022

    best PM Modiji💜💜💜💜💜💜💜
  • Dr Priyanka Verma January 09, 2022

    jay hind
  • Dr Priyanka Verma January 09, 2022

    jai ho
  • BJP S MUTHUVELPANDI MA LLB VICE PRESIDENT ARUPPUKKOTTAI UNION January 08, 2022

    9*7=63
  • शिवकुमार गुप्ता January 06, 2022

    जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय
  • hari shankar shukla January 04, 2022

    धध
  • Raj kumar Das January 03, 2022

    इसकी रफ़्तार देखो इसका विकास देखो ये है डबल इंजन सरकार विपक्ष हुआ बेकार🙏🌷
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India's defence exports surge to record Rs 23,622 crore in 2024-25: Rajnath

Media Coverage

India's defence exports surge to record Rs 23,622 crore in 2024-25: Rajnath
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM reflects on Navratri's sacred journey with worship of Maa Ambe
April 02, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi today reflected on Navratri’s sacred journey with worship of Maa Ambe. Urging everyone to listen, he shared a prayer dedicated to the forms of Devi Maa.

In a post on X, he wrote:

“नवरात्रि में मां अम्बे की उपासना सभी भक्तों को भावविभोर कर देती है। देवी मां के स्वरूपों को समर्पित यह स्तुति अलौकिक अनुभूति देने वाली है। आप भी सुनिए…”