रेणुकाजी धरण प्रकल्पाची पंतप्रधान करणार पायाभरणी- पंतप्रधानांच्या सहकारी संघराज्याच्या दृष्टीकोनाअंतर्गत सहा राज्यांना एकत्र आणून प्रकल्पाचे काम
दिल्लीच्या पाणीपुरवठ्यात भरीव वाढ होऊन प्रकल्प दिल्लीसाठी ठरणार लाभदायक
लुहरी टप्पा 1 आणि धौलसीध जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान करणार
सवरा-कुड्डू जलविद्युत प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या दुसऱ्या नाविन्यपूर्ण समारंभाचे पंतप्रधान अध्यक्षस्थान भूषवतील
हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या दुसऱ्या नाविन्यपूर्ण समारंभाचे पंतप्रधान अध्यक्षस्थान भूषवतील
या परिषदेच्या माध्यमातून सुमारे 28,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करून या प्रदेशातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर 2021 रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील दौरा करणार आहेत. दुपारी 12 वाजता ते सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यापूर्वी सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या दुसऱ्या नाविन्यपूर्ण समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

देशात उपलब्ध असलेल्या अद्याप  वापरात न आणलेल्या  संसाधनांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यावर पंतप्रधानांनी सतत लक्ष केंद्रित केले आहे.
याबाबतीतील एक पाऊल म्हणजे हिमालयीन प्रदेशातील जलविद्युत क्षमतेचा योग्य वापर करणे.या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते  होणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन  आणि पायाभरणी हे या  दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल प्रतिबिंबित करते.

रेणुकाजी धरण प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. केंद्र सरकारने  हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, उत्तराखंड आणि दिल्ली या सहा राज्यांना एकत्रित आणून सुमारे तीन दशकांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प पंतप्रधानांच्या सहकार संघराज्यवादाच्या दृष्टीकोनातून शक्य झाला आहे. 40 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प सुमारे 7000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे.या प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे 500 दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा होणार असून दिल्लीसाठी हा प्रकल्प अत्यंत फायदेशीर ठरणार आहे

 

लुहरी टप्पा  1 जलविद्युत  प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. 210 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प सुमारे 1800 कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे. यामुळे वर्षाला 750 दशलक्ष युनिट्सहून अधिक वीजनिर्मिती होईल. आधुनिक आणि विश्वसनीय ग्रीडच्या आधारामुळे या  प्रदेशाच्या शेजारील राज्यांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे.

धौलसीध जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. हमीरपूर जिल्ह्यातील हा पहिला जलविद्युत प्रकल्प असून 66 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प सुमारे 680 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे वर्षाला 300 दशलक्ष युनिटपेक्षा जास्त वीजनिर्मिती होईल.


सवरा-कुड्डू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटनही  पंतप्रधान करणार आहेत. 111 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प सुमारे 2080 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात येणार आहे. यामुळे प्रतिवर्षी 380 दशलक्ष युनिटपेक्षा जास्त वीजनिर्मिती होईल आणि राज्याला वार्षिक 120 कोटी रुपयांचा महसूल मिळण्यास सहाय्य मिळेल.

पंतप्रधान दुसऱ्या  हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे अध्यक्षपदही भूषवतील. सुमारे 28,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करून या परिषदेच्या माध्यमातून या प्रदेशातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"