Quoteराणी कमलापती रेल्वे स्थानक येथे पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पाच वंदे भारत एक्स्प्रेस होणार रवाना
Quoteभोपाळ (राणी कमलापती)-इंदोर, भोपाळ (राणी कमलापती)-जबलपूर, रांची-पटना, धारवाड-बेंगळूरू आणि गोवा (मडगाव)-मुंबई या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यात येणार
Quoteगोवा, बिहार आणि झारखंड या राज्यांना प्रथमच मिळणार वंदे भारत रेल्वे गाड्यांची सुविधा
Quoteया गाड्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देतील आणि पर्यटनाला चालना देतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 27 जून 2023 रोजी मध्य प्रदेशाच्या भेटीवर जाणार आहेत.

सकाळी साडेदहाच्या सुमारास पंतप्रधान राणी कमलापती रेल्वे स्थानकावर पोहोचतील आणि पाच वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. या पाच वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या पुढीलप्रमाणे आहेत: या पाच वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या पुढीलप्रमाणे आहेत: भोपाळ (राणी कमलापती) ते इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस, भोपाळ (राणी कमलापती) ते जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, रांची ते पटना वंदे भारत एक्स्प्रेस, धारवाड ते बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस आणि गोवा (मडगाव) ते मुंबई  वंदे भारत एक्स्प्रेस.

भोपाळ (राणी कमलापती) ते इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी मध्य प्रदेशातील दोन महत्त्वाच्या शहरांच्या दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि जलदगतीने करण्याची सुविधा देईल. तसेच ही गाडी या प्रदेशातील सांस्कृतिकदृष्ट्या, पर्यटन दृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांमधील प्रवास सुविधेत सुधारणा घडवून आणेल.

भोपाळ (राणी कमलापती)-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी जबलपूरच्या महाकौशल भागाला मध्य प्रदेशाच्या मध्यवर्ती भागाशी (भोपाळ) जोडेल. तसेच या भागातील पर्यटनस्थळांना यामुळे फायदा होणार आहे.

रांची-पटना वंदे भारत एक्स्प्रेस ही झारखंड तसेच बिहार या राज्यांसाठी सुरु होणारी पहिलीच वंदे भारत गाडी आहे. पटना आणि रांची या शहरांच्या जोडणीत सुधारणा करणारी ही गाडी पर्यटक, विद्यार्थी तसेच व्यापाऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे.

धारवाड-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी कर्नाटकातील धारवाड, हुबळी आणि दावणगिरी या महत्त्वाच्या शहरांना बेंगळूरू या कर्नाटक राज्याच्या राजधानीच्या शहराशी जोडेल. या भागातील पर्यटक, विद्यार्थी, उद्योजक इत्यादींना या गाडीमुळे खूप फायदा होईल.

गोवा (मडगाव) -मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही गोव्यासाठीची पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्याचे मडगाव रेल्वे स्थानक यांच्या दरम्यान धावेल तसेच गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील पर्यटनाला देखील चालना देईल.

 

  • Dipanjoy shil December 27, 2023

    bharat Mata ki Jay🇮🇳
  • Santhoshpriyan E October 01, 2023

    Jai hind
  • Dr Sudhanshu Dutt Sharma July 20, 2023

    मुझे गर्व है कि मैंने मोदी युग में जन्म लिया। आपकी कड़ी मेहनत और देश के लिए समर्पण एक मिसाल है ।आप का को युगों युगों तक याद किया जायेगा। जय श्री राम🚩🚩🚩🚩
  • Sundar lal jatav July 11, 2023

    माननीय परम श्रद्धेय प्रधानमंत्री जी का स्वागत वंदन अभिनंदन है 🙏🌹
  • seema mishra July 07, 2023

    जय जय श्री राम
  • MLA KUMAR AILANI July 04, 2023

    जय श्री राम
  • Ranoj Pegu July 01, 2023

    Namo Namo
  • Manisha Pathak June 30, 2023

    माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत वंदन अभिनंदन है 💐💐
  • વીભાભાઈ ડવ June 29, 2023

    NAMO NAMO
  • VenkataRamakrishna June 28, 2023

    జై శ్రీ రామ్
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India's first microbiological nanosat, developed by students, to find ways to keep astronauts healthy

Media Coverage

India's first microbiological nanosat, developed by students, to find ways to keep astronauts healthy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 फेब्रुवारी 2025
February 20, 2025

Citizens Appreciate PM Modi's Effort to Foster Innovation and Economic Opportunity Nationwide