पंतप्रधानांच्या हस्ते झारखंडमधील टाटानगर येथे 660 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण
पंतप्रधान झारखंडमध्ये सहा वंदे भारत रेल्वे गाड्यांना दाखवणार हिरवा झेंडा
पंतप्रधान अहमदाबादमध्ये 8,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार
गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे आयोजित चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे (री-इन्व्हेस्ट) पंतप्रधान करणार उद्घाटन
'सुभद्रा' या - सर्वात मोठ्या, एकल महिला-केंद्रित योजनेचा पंतप्रधान करणार प्रारंभ
भुवनेश्वरमध्ये आयोजित, पीएमएवाय योजनेच्या देशभरातील 26 लाख लाभार्थ्यांसाठी गृहप्रवेश सोहळ्यात पंतप्रधान होणार सहभागी
अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी आवास+ 2024 ॲप पंतप्रधान करणार लाँच

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15-17 सप्टेंबर 2024 रोजी झारखंड, गुजरात आणि ओडिशा या राज्यांना भेट देणार आहेत.

15 सप्टेंबर रोजी पंतप्रधान झारखंडला जातील आणि सकाळी 10 वाजता ते झारखंडमधील टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानक येथे टाटानगर-पटना वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.  सकाळी 10:30 वाजता ते सुमारे 660 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण करतील. तसेच ते  झारखंडमधील टाटानगर येथील प्रधान मंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) च्या 20 हजार लाभार्थ्यांना आवास मंजुरी पत्रांचे वाटप करतील.

16 सप्टेंबर रोजी, सकाळी 09:45 वाजता, पंतप्रधान गुजरातमधील गांधीनगर येथे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील.  त्यानंतर सकाळी 10:30 वाजता ते गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे आयोजित चौथ्या नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे (री-इन्व्हेस्ट) उद्घाटन करतील.  दुपारी 1:45 वाजता पंतप्रधान अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील आणि सेक्शन 1 मेट्रो स्टेशनपासून गिफ्ट सिटी मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास करतील. पंतप्रधान दुपारी 3:30 वाजता, अहमदाबादमध्ये 8,000 कोटी रुपयांहून अधिक ओडिशा किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. 

17 सप्टेंबर रोजी, पंतप्रधान ओदिशाला जातील आणि सकाळी 11:15 वाजता, ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या - (शहरी) लाभार्थ्यांशी संवाद साधतील.  त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते भुवनेश्वर येथे 3800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रसमर्पण करतील.

पंतप्रधानांचे टाटा नगरमधील कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीमार्फत 660 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रसमर्पण करतील. ते देवघर जिल्ह्यातील मधुपूर बायपास लाइन आणि झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील हजारीबाग टाउन कोचिंग डेपोची पायाभरणी देखील करतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, मधुपूर बायपास मार्गामुळे हावडा-दिल्ली मेनलाइनवर गाड्यांचा खोळंबा टाळण्यात मदत होईल तसेच गिरिडीह आणि जसिडीह दरम्यानचा प्रवास वेळ कमी करण्यात मदत होईल. यासोबतच, हजारीबाग टाउन कोचिंग डेपो या स्थानकावरील कोचिंग स्टॉकची देखभाल सुलभ करण्यात मदत होईल.

पंतप्रधान कुरकुरा-कनारोन हा दुहेरीकरण झालेला रेल्वे मार्ग देखील राष्ट्राला समर्पित करतील. हा रेल्वे मार्ग बोंडामुंडा-रांची सिंगल लाइन सेक्शनचा भाग आहे आणि सोबतच  रांची, मुरी आणि चंद्रपुरा स्थानकामार्गे जाणाऱ्या राउरकेला-गोमोह या रेल्वे मार्गाचा देखील भाग आहे.  या प्रकल्पामुळे माल आणि प्रवासी वाहतुकीची गती वाढण्यास मदत होईल.  याशिवाय, सामान्य लोकांच्या सुरक्षितता लक्षात घेऊन बांधण्यात आलेले 04 रोड अंडर ब्रिज (RUBs) देखील पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित केले जातील.

पंतप्रधान सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.  अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या पुढील मार्गांवरील संपर्क सुविधा सुधारतील:

1) टाटानगर – पाटणा

2) भागलपूर - दुमका - हावडा

3) ब्रह्मपूर - टाटानगर

4) गया - हावडा

5) देवघर – वाराणसी

6) राउरकेला - हावडा

या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या सुरू केल्याने नियमित प्रवासी, व्यावसायिक, व्यापारी आणि विद्यार्थी समुदायाला फायदा होईल.  या गाड्या देवघर (झारखंड) येथील बैद्यनाथ धाम, वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील काशी विश्वनाथ मंदिर, कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील कालीघाट, बेलूर मठ इत्यादी तीर्थक्षेत्रांपर्यंत जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देऊन या प्रदेशातील धार्मिक पर्यटनाला चालना देतील.  याशिवाय धनबादमधील कोळसा खाणी उद्योग, कोलकात्यातील ज्यूट उद्योग, दुर्गापूरमधील लोह आणि पोलाद उद्योगांनाही यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

सर्वांसाठी घरे या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान झारखंडमधील 20 हजार प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) लाभार्थ्यांना घरांच्या मंजुरी पत्रांचे वितरण करतील. ते लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता देखील जारी करतील. 46 हजार लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळ्यातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत.

पंतप्रधानांचे गांधीनगरमधील कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे री-इन्व्हेस्ट 2024 चे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम नवीकरणीय ऊर्जा उत्पादन आणि उपयोजनामध्ये भारताच्या प्रभावी प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.  अडीच दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. उपस्थित प्रतिनिधी विविध सर्वसमावेशक कार्यक्रमात सहभागी होतील ज्यात मुख्यमंत्र्यांची मुख्य बैठक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची  गोलमेज परिषद आणि नवोन्मेषी वित्तपुरवठा, हरित हायड्रोजन आणि भविष्यातील ऊर्जा पर्यायांवर विशेष चर्चा यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि नॉर्वे हे देश भागीदार म्हणून सहभागी होत आहेत.  गुजरात राज्य हे यजमान राज्य तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश ही राज्ये भागीदार राज्ये म्हणून सहभागी होणार आहेत.

200 GW पेक्षा जास्त स्थापित गैर-जीवाश्म इंधन क्षमतेच्या भारताच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा या परिषदेत सन्मान केला जाणार आहे. यावेळी आयोजित एका प्रदर्शनात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट-अप आणि प्रमुख उद्योग क्षेत्रातील आघाडीचे उद्योग आपल्या अत्याधुनिक नवकल्पना प्रदर्शित करणार आहेत.  हे प्रदर्शन शाश्वत भविष्यासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित करेल.

पंतप्रधानांचे अहमदाबादमधील कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मधील अहमदाबाद येथे 8,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधान काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील. यामध्ये पुढील प्रकल्पांचा समावेश आहे - समखियाली-गांधीधाम आणि गांधीधाम-आदिपूर रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण; अहमदाबादमधील एएमसी भागातील महत्वपूर्ण रस्त्यांचा विकास, तसेच बाकरोल, हाथीजन, रामोल आणि पांजरपोळ जंक्शनवर उड्डाण पूल बांधणे.

पंतप्रधान 30 मेगावॅटच्या सौर यंत्रणेचे उद्घाटन करतील.  ते कच्छ लिग्नाइट थर्मल पॉवर स्टेशन येथे 35 मेगावॅट BESS सोलर पीव्ही प्रकल्प आणि मोरबी आणि राजकोट येथे 220 किलोवोल्ट सबस्टेशनचे उद्घाटन देखील करतील.

पंतप्रधान आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची एकल खिडकी माहिती तंत्रज्ञान प्रणाली (SWITS) लाँच करतील, जी वित्तीय सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी आरेखित करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत 30,000 हून अधिक घरांना पंतप्रधान मंजूर देतील आणि या घरांसाठी पहिला हप्ता देखील जारी करतील, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांच्या बांधकामाचा प्रारंभ करतील.  प्रधानमंत्री आवास योजनेच्याच्या शहरी आणि ग्रामीण या दोन्ही विभागांतर्गत पूर्ण झालेली घरे राज्यातील लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते सुपूर्द केली जातील.

याशिवाय, पंतप्रधान भुज ते अहमदाबाद अशी भारतातील पहिली वंदे मेट्रो तसेच नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे, आग्रा कँटोन्मेंट ते बनारस, दुर्ग ते विशाखापट्टणम, पुणे ते हुबळी वंदे भारत रेल्वे गाड्यांसह वाराणसी ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या 20 डबे असणाऱ्या वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधानांचे भुवनेश्वरमधील कार्यक्रम

भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान ओदिशा सरकारची प्रमुख योजना ‘सुभद्रा’ लाँच करतील.  ही सर्वात मोठी, एकल महिला-केंद्रित योजना आहे आणि या योजनेत 1 कोटींहून अधिक महिलांचा समावेश अपेक्षित आहे.  योजनेअंतर्गत, 21-60 वर्षे वयोगटातील सर्व पात्र लाभार्थींना  2024-25 ते 2028-29 दरम्यान 5 वर्षांच्या कालावधीत 50,000 रुपये दिले जाणार आहेत.  दरवर्षी 10,000 रुपये इतकी रक्कम दोन समान हप्त्यांमध्ये  थेट लाभार्थ्यांच्या आधार-सक्षम आणि डीबीटी-सक्षम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.  या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरणाची सुरुवात करणार आहेत.

पंतप्रधान भुवनेश्वरमध्ये 2800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि राष्ट्राला समर्पित करतील.  हे रेल्वे प्रकल्प ओदिशातील रेल्वे पायाभूत वर्धित करतील आणि या प्रदेशाची वाढ तसेच संपर्क सुविधा सुधारतील. यासोबतच पंतप्रधानांच्या हस्ते 1,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी देखील केली जाणार आहे.

पंतप्रधान सुमारे 14 राज्यांतील प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत सुमारे 13 लाख लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता जारी करतील. या कार्यक्रमादरम्यान देशभरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) 26 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे.  पंतप्रधान या घराच्या चाव्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या  (ग्रामीण आणि शहरी) लाभार्थ्यांना सुपूर्द करतील. प्रधानमंत्री आवास योजना -  ग्रामीण  साठी अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी  आवास+ 2024 ॲप देखील पंतप्रधानांच्या हस्ते लॉन्च करण्यात येणार आहे.  याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 2.0 ची कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वे पंतप्रधान लाँच करतील.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM Modi's address at the Parliament of Guyana
November 21, 2024

Hon’ble Speaker, मंज़ूर नादिर जी,
Hon’ble Prime Minister,मार्क एंथनी फिलिप्स जी,
Hon’ble, वाइस प्रेसिडेंट भरत जगदेव जी,
Hon’ble Leader of the Opposition,
Hon’ble Ministers,
Members of the Parliament,
Hon’ble The चांसलर ऑफ द ज्यूडिशियरी,
अन्य महानुभाव,
देवियों और सज्जनों,

गयाना की इस ऐतिहासिक पार्लियामेंट में, आप सभी ने मुझे अपने बीच आने के लिए निमंत्रित किया, मैं आपका बहुत-बहुत आभारी हूं। कल ही गयाना ने मुझे अपना सर्वोच्च सम्मान दिया है। मैं इस सम्मान के लिए भी आप सभी का, गयाना के हर नागरिक का हृदय से आभार व्यक्त करता हूं। गयाना का हर नागरिक मेरे लिए ‘स्टार बाई’ है। यहां के सभी नागरिकों को धन्यवाद! ये सम्मान मैं भारत के प्रत्येक नागरिक को समर्पित करता हूं।

साथियों,

भारत और गयाना का नाता बहुत गहरा है। ये रिश्ता, मिट्टी का है, पसीने का है,परिश्रम का है करीब 180 साल पहले, किसी भारतीय का पहली बार गयाना की धरती पर कदम पड़ा था। उसके बाद दुख में,सुख में,कोई भी परिस्थिति हो, भारत और गयाना का रिश्ता, आत्मीयता से भरा रहा है। India Arrival Monument इसी आत्मीय जुड़ाव का प्रतीक है। अब से कुछ देर बाद, मैं वहां जाने वाला हूं,

साथियों,

आज मैं भारत के प्रधानमंत्री के रूप में आपके बीच हूं, लेकिन 24 साल पहले एक जिज्ञासु के रूप में मुझे इस खूबसूरत देश में आने का अवसर मिला था। आमतौर पर लोग ऐसे देशों में जाना पसंद करते हैं, जहां तामझाम हो, चकाचौंध हो। लेकिन मुझे गयाना की विरासत को, यहां के इतिहास को जानना था,समझना था, आज भी गयाना में कई लोग मिल जाएंगे, जिन्हें मुझसे हुई मुलाकातें याद होंगीं, मेरी तब की यात्रा से बहुत सी यादें जुड़ी हुई हैं, यहां क्रिकेट का पैशन, यहां का गीत-संगीत, और जो बात मैं कभी नहीं भूल सकता, वो है चटनी, चटनी भारत की हो या फिर गयाना की, वाकई कमाल की होती है,

साथियों,

बहुत कम ऐसा होता है, जब आप किसी दूसरे देश में जाएं,और वहां का इतिहास आपको अपने देश के इतिहास जैसा लगे,पिछले दो-ढाई सौ साल में भारत और गयाना ने एक जैसी गुलामी देखी, एक जैसा संघर्ष देखा, दोनों ही देशों में गुलामी से मुक्ति की एक जैसी ही छटपटाहट भी थी, आजादी की लड़ाई में यहां भी,औऱ वहां भी, कितने ही लोगों ने अपना जीवन समर्पित कर दिया, यहां गांधी जी के करीबी सी एफ एंड्रूज हों, ईस्ट इंडियन एसोसिएशन के अध्यक्ष जंग बहादुर सिंह हों, सभी ने गुलामी से मुक्ति की ये लड़ाई मिलकर लड़ी,आजादी पाई। औऱ आज हम दोनों ही देश,दुनिया में डेमोक्रेसी को मज़बूत कर रहे हैं। इसलिए आज गयाना की संसद में, मैं आप सभी का,140 करोड़ भारतवासियों की तरफ से अभिनंदन करता हूं, मैं गयाना संसद के हर प्रतिनिधि को बधाई देता हूं। गयाना में डेमोक्रेसी को मजबूत करने के लिए आपका हर प्रयास, दुनिया के विकास को मजबूत कर रहा है।

साथियों,

डेमोक्रेसी को मजबूत बनाने के प्रयासों के बीच, हमें आज वैश्विक परिस्थितियों पर भी लगातार नजर ऱखनी है। जब भारत और गयाना आजाद हुए थे, तो दुनिया के सामने अलग तरह की चुनौतियां थीं। आज 21वीं सदी की दुनिया के सामने, अलग तरह की चुनौतियां हैं।
दूसरे विश्व युद्ध के बाद बनी व्यवस्थाएं और संस्थाएं,ध्वस्त हो रही हैं, कोरोना के बाद जहां एक नए वर्ल्ड ऑर्डर की तरफ बढ़ना था, दुनिया दूसरी ही चीजों में उलझ गई, इन परिस्थितियों में,आज विश्व के सामने, आगे बढ़ने का सबसे मजबूत मंत्र है-"Democracy First- Humanity First” "Democracy First की भावना हमें सिखाती है कि सबको साथ लेकर चलो,सबको साथ लेकर सबके विकास में सहभागी बनो। Humanity First” की भावना हमारे निर्णयों की दिशा तय करती है, जब हम Humanity First को अपने निर्णयों का आधार बनाते हैं, तो नतीजे भी मानवता का हित करने वाले होते हैं।

साथियों,

हमारी डेमोक्रेटिक वैल्यूज इतनी मजबूत हैं कि विकास के रास्ते पर चलते हुए हर उतार-चढ़ाव में हमारा संबल बनती हैं। एक इंक्लूसिव सोसायटी के निर्माण में डेमोक्रेसी से बड़ा कोई माध्यम नहीं। नागरिकों का कोई भी मत-पंथ हो, उसका कोई भी बैकग्राउंड हो, डेमोक्रेसी हर नागरिक को उसके अधिकारों की रक्षा की,उसके उज्जवल भविष्य की गारंटी देती है। और हम दोनों देशों ने मिलकर दिखाया है कि डेमोक्रेसी सिर्फ एक कानून नहीं है,सिर्फ एक व्यवस्था नहीं है, हमने दिखाया है कि डेमोक्रेसी हमारे DNA में है, हमारे विजन में है, हमारे आचार-व्यवहार में है।

साथियों,

हमारी ह्यूमन सेंट्रिक अप्रोच,हमें सिखाती है कि हर देश,हर देश के नागरिक उतने ही अहम हैं, इसलिए, जब विश्व को एकजुट करने की बात आई, तब भारत ने अपनी G-20 प्रेसीडेंसी के दौरान One Earth, One Family, One Future का मंत्र दिया। जब कोरोना का संकट आया, पूरी मानवता के सामने चुनौती आई, तब भारत ने One Earth, One Health का संदेश दिया। जब क्लाइमेट से जुड़े challenges में हर देश के प्रयासों को जोड़ना था, तब भारत ने वन वर्ल्ड, वन सन, वन ग्रिड का विजन रखा, जब दुनिया को प्राकृतिक आपदाओं से बचाने के लिए सामूहिक प्रयास जरूरी हुए, तब भारत ने CDRI यानि कोएलिशन फॉर डिज़ास्टर रज़ीलिएंट इंफ्रास्ट्रक्चर का initiative लिया। जब दुनिया में pro-planet people का एक बड़ा नेटवर्क तैयार करना था, तब भारत ने मिशन LiFE जैसा एक global movement शुरु किया,

साथियों,

"Democracy First- Humanity First” की इसी भावना पर चलते हुए, आज भारत विश्वबंधु के रूप में विश्व के प्रति अपना कर्तव्य निभा रहा है। दुनिया के किसी भी देश में कोई भी संकट हो, हमारा ईमानदार प्रयास होता है कि हम फर्स्ट रिस्पॉन्डर बनकर वहां पहुंचे। आपने कोरोना का वो दौर देखा है, जब हर देश अपने-अपने बचाव में ही जुटा था। तब भारत ने दुनिया के डेढ़ सौ से अधिक देशों के साथ दवाएं और वैक्सीन्स शेयर कीं। मुझे संतोष है कि भारत, उस मुश्किल दौर में गयाना की जनता को भी मदद पहुंचा सका। दुनिया में जहां-जहां युद्ध की स्थिति आई,भारत राहत और बचाव के लिए आगे आया। श्रीलंका हो, मालदीव हो, जिन भी देशों में संकट आया, भारत ने आगे बढ़कर बिना स्वार्थ के मदद की, नेपाल से लेकर तुर्की और सीरिया तक, जहां-जहां भूकंप आए, भारत सबसे पहले पहुंचा है। यही तो हमारे संस्कार हैं, हम कभी भी स्वार्थ के साथ आगे नहीं बढ़े, हम कभी भी विस्तारवाद की भावना से आगे नहीं बढ़े। हम Resources पर कब्जे की, Resources को हड़पने की भावना से हमेशा दूर रहे हैं। मैं मानता हूं,स्पेस हो,Sea हो, ये यूनीवर्सल कन्फ्लिक्ट के नहीं बल्कि यूनिवर्सल को-ऑपरेशन के विषय होने चाहिए। दुनिया के लिए भी ये समय,Conflict का नहीं है, ये समय, Conflict पैदा करने वाली Conditions को पहचानने और उनको दूर करने का है। आज टेरेरिज्म, ड्रग्स, सायबर क्राइम, ऐसी कितनी ही चुनौतियां हैं, जिनसे मुकाबला करके ही हम अपनी आने वाली पीढ़ियों का भविष्य संवार पाएंगे। और ये तभी संभव है, जब हम Democracy First- Humanity First को सेंटर स्टेज देंगे।

साथियों,

भारत ने हमेशा principles के आधार पर, trust और transparency के आधार पर ही अपनी बात की है। एक भी देश, एक भी रीजन पीछे रह गया, तो हमारे global goals कभी हासिल नहीं हो पाएंगे। तभी भारत कहता है – Every Nation Matters ! इसलिए भारत, आयलैंड नेशन्स को Small Island Nations नहीं बल्कि Large ओशिन कंट्रीज़ मानता है। इसी भाव के तहत हमने इंडियन ओशन से जुड़े आयलैंड देशों के लिए सागर Platform बनाया। हमने पैसिफिक ओशन के देशों को जोड़ने के लिए भी विशेष फोरम बनाया है। इसी नेक नीयत से भारत ने जी-20 की प्रेसिडेंसी के दौरान अफ्रीकन यूनियन को जी-20 में शामिल कराकर अपना कर्तव्य निभाया।

साथियों,

आज भारत, हर तरह से वैश्विक विकास के पक्ष में खड़ा है,शांति के पक्ष में खड़ा है, इसी भावना के साथ आज भारत, ग्लोबल साउथ की भी आवाज बना है। भारत का मत है कि ग्लोबल साउथ ने अतीत में बहुत कुछ भुगता है। हमने अतीत में अपने स्वभाव औऱ संस्कारों के मुताबिक प्रकृति को सुरक्षित रखते हुए प्रगति की। लेकिन कई देशों ने Environment को नुकसान पहुंचाते हुए अपना विकास किया। आज क्लाइमेट चेंज की सबसे बड़ी कीमत, ग्लोबल साउथ के देशों को चुकानी पड़ रही है। इस असंतुलन से दुनिया को निकालना बहुत आवश्यक है।

साथियों,

भारत हो, गयाना हो, हमारी भी विकास की आकांक्षाएं हैं, हमारे सामने अपने लोगों के लिए बेहतर जीवन देने के सपने हैं। इसके लिए ग्लोबल साउथ की एकजुट आवाज़ बहुत ज़रूरी है। ये समय ग्लोबल साउथ के देशों की Awakening का समय है। ये समय हमें एक Opportunity दे रहा है कि हम एक साथ मिलकर एक नया ग्लोबल ऑर्डर बनाएं। और मैं इसमें गयाना की,आप सभी जनप्रतिनिधियों की भी बड़ी भूमिका देख रहा हूं।

साथियों,

यहां अनेक women members मौजूद हैं। दुनिया के फ्यूचर को, फ्यूचर ग्रोथ को, प्रभावित करने वाला एक बहुत बड़ा फैक्टर दुनिया की आधी आबादी है। बीती सदियों में महिलाओं को Global growth में कंट्रीब्यूट करने का पूरा मौका नहीं मिल पाया। इसके कई कारण रहे हैं। ये किसी एक देश की नहीं,सिर्फ ग्लोबल साउथ की नहीं,बल्कि ये पूरी दुनिया की कहानी है।
लेकिन 21st सेंचुरी में, global prosperity सुनिश्चित करने में महिलाओं की बहुत बड़ी भूमिका होने वाली है। इसलिए, अपनी G-20 प्रेसीडेंसी के दौरान, भारत ने Women Led Development को एक बड़ा एजेंडा बनाया था।

साथियों,

भारत में हमने हर सेक्टर में, हर स्तर पर, लीडरशिप की भूमिका देने का एक बड़ा अभियान चलाया है। भारत में हर सेक्टर में आज महिलाएं आगे आ रही हैं। पूरी दुनिया में जितने पायलट्स हैं, उनमें से सिर्फ 5 परसेंट महिलाएं हैं। जबकि भारत में जितने पायलट्स हैं, उनमें से 15 परसेंट महिलाएं हैं। भारत में बड़ी संख्या में फाइटर पायलट्स महिलाएं हैं। दुनिया के विकसित देशों में भी साइंस, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, मैथ्स यानि STEM graduates में 30-35 परसेंट ही women हैं। भारत में ये संख्या फोर्टी परसेंट से भी ऊपर पहुंच चुकी है। आज भारत के बड़े-बड़े स्पेस मिशन की कमान महिला वैज्ञानिक संभाल रही हैं। आपको ये जानकर भी खुशी होगी कि भारत ने अपनी पार्लियामेंट में महिलाओं को रिजर्वेशन देने का भी कानून पास किया है। आज भारत में डेमोक्रेटिक गवर्नेंस के अलग-अलग लेवल्स पर महिलाओं का प्रतिनिधित्व है। हमारे यहां लोकल लेवल पर पंचायती राज है, लोकल बॉड़ीज़ हैं। हमारे पंचायती राज सिस्टम में 14 लाख से ज्यादा यानि One point four five मिलियन Elected Representatives, महिलाएं हैं। आप कल्पना कर सकते हैं, गयाना की कुल आबादी से भी करीब-करीब दोगुनी आबादी में हमारे यहां महिलाएं लोकल गवर्नेंट को री-प्रजेंट कर रही हैं।

साथियों,

गयाना Latin America के विशाल महाद्वीप का Gateway है। आप भारत और इस विशाल महाद्वीप के बीच अवसरों और संभावनाओं का एक ब्रिज बन सकते हैं। हम एक साथ मिलकर, भारत और Caricom की Partnership को और बेहतर बना सकते हैं। कल ही गयाना में India-Caricom Summit का आयोजन हुआ है। हमने अपनी साझेदारी के हर पहलू को और मजबूत करने का फैसला लिया है।

साथियों,

गयाना के विकास के लिए भी भारत हर संभव सहयोग दे रहा है। यहां के इंफ्रास्ट्रक्चर में निवेश हो, यहां की कैपेसिटी बिल्डिंग में निवेश हो भारत और गयाना मिलकर काम कर रहे हैं। भारत द्वारा दी गई ferry हो, एयरक्राफ्ट हों, ये आज गयाना के बहुत काम आ रहे हैं। रीन्युएबल एनर्जी के सेक्टर में, सोलर पावर के क्षेत्र में भी भारत बड़ी मदद कर रहा है। आपने t-20 क्रिकेट वर्ल्ड कप का शानदार आयोजन किया है। भारत को खुशी है कि स्टेडियम के निर्माण में हम भी सहयोग दे पाए।

साथियों,

डवलपमेंट से जुड़ी हमारी ये पार्टनरशिप अब नए दौर में प्रवेश कर रही है। भारत की Energy डिमांड तेज़ी से बढ़ रही हैं, और भारत अपने Sources को Diversify भी कर रहा है। इसमें गयाना को हम एक महत्वपूर्ण Energy Source के रूप में देख रहे हैं। हमारे Businesses, गयाना में और अधिक Invest करें, इसके लिए भी हम निरंतर प्रयास कर रहे हैं।

साथियों,

आप सभी ये भी जानते हैं, भारत के पास एक बहुत बड़ी Youth Capital है। भारत में Quality Education और Skill Development Ecosystem है। भारत को, गयाना के ज्यादा से ज्यादा Students को Host करने में खुशी होगी। मैं आज गयाना की संसद के माध्यम से,गयाना के युवाओं को, भारतीय इनोवेटर्स और वैज्ञानिकों के साथ मिलकर काम करने के लिए भी आमंत्रित करता हूँ। Collaborate Globally And Act Locally, हम अपने युवाओं को इसके लिए Inspire कर सकते हैं। हम Creative Collaboration के जरिए Global Challenges के Solutions ढूंढ सकते हैं।

साथियों,

गयाना के महान सपूत श्री छेदी जगन ने कहा था, हमें अतीत से सबक लेते हुए अपना वर्तमान सुधारना होगा और भविष्य की मजबूत नींव तैयार करनी होगी। हम दोनों देशों का साझा अतीत, हमारे सबक,हमारा वर्तमान, हमें जरूर उज्जवल भविष्य की तरफ ले जाएंगे। इन्हीं शब्दों के साथ मैं अपनी बात समाप्त करता हूं, मैं आप सभी को भारत आने के लिए भी निमंत्रित करूंगा, मुझे गयाना के ज्यादा से ज्यादा जनप्रतिनिधियों का भारत में स्वागत करते हुए खुशी होगी। मैं एक बार फिर गयाना की संसद का, आप सभी जनप्रतिनिधियों का, बहुत-बहुत आभार, बहुत बहुत धन्यवाद।