पंतप्रधान राजस्थानात पोखरण येथे करतील भारत शक्ती सरावाचे निरिक्षण
भारतशक्ती हा तिन्ही सेनादलांचा नेमबाजी आणि लष्करी डावपेचांचा सराव, यातून देशाच्या आत्मनिर्भरतेकडे होणाऱ्या मार्गक्रमणेचे दर्शन घडेल.
पंतप्रधान अहमदाबादेत 85,000 कोटी रुपयांच्या खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील
पंतप्रधान समर्पित मालवाहतूक कॉरिडोर प्रकल्पाचे महत्त्वाचे खंड राष्ट्रार्पण करतील
पंतप्रधान तहान अभिनंदन भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.
पंतप्रधान कोचरब आश्रमाचे उद्घाटन तसेच साबरमतीच्या गांधी आश्रम स्मारकाच्या मुख्य आराखड्याचे अनावरण करतील.
पंतप्रधान स्वदेशी संरक्षण क्षमतांचे दर्शन घडवणाऱ्या एकत्रित प्रात्यक्षिकांचे तिन्ही दलांनी नेमबाजी आणि लष्करी डावपेच सरावातून घडवलेल्या प्रात्यक्षिकाचे साक्षीदार होतील.

पंतप्रधान 12 मार्च 2024 रोजी गुजरात आणि राजस्थानला भेट देणार आहेत. साधारण सकाळी सव्वानऊ वाजता पंतप्रधान 85,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर दहा वाजता पंतप्रधान साबरमती आश्रमाला भेट देतील, तिथे ते कोचरब आश्रमाचे उद्घाटन करतील तसेच गांधी आश्रम स्मारकाच्या मुख्य आराखड्याचे अनावरणही करतील. त्यानंतर पावणेदोन वाजता पंतप्रधान राजस्थानात पोखरण येथे भारत शक्ती या संयुक्त आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणाऱ्या तिन्ही दलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेच सरावाचे प्रात्यक्षिक बघतील.

पोखरणमध्ये पंतप्रधान

पंतप्रधान स्वदेशी संरक्षण क्षमतांचे दर्शन घडवणाऱ्या एकत्रित प्रात्यक्षिकांचे तिन्ही दलांनी  नेमबाजी आणि लष्करी डावपेच सरावातून घडवलेल्या प्रात्यक्षिकाचे साक्षीदार होतील.

भारत शक्ती हा सराव स्वदेशी शस्त्रास्त्रे व्यवस्थेचे दर्शन घडवेल आणि देशाच्या पराक्रमाचा आधार असलेल्या आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवेल. भूमी, हवाई, सागरी आणि अंतराळ या सर्व ठिकाणावरून येऊ शकणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांची एकात्मिक कार्यक्षमता प्रदर्शित करणारा हा सराव वास्तविक आणि समायोचित  अनेकांगी कामकाजाचे दर्शन घडवेल.

या सरावात सामील असणारी महत्त्वाचे उपकरणे तसेच शस्त्रास्त्रे यामध्ये  भारतीय लष्करातील  T-90 (IM) रणगाडे, धनुष आणि सारंग पिस्तुले, आकाश शस्त्र व्यवस्था, वाहतूक ड्रोन रोबोटिक खेचर, आधुनिक कमी वजनाचे हेलिकॉप्टर तसेच मनुष्यविरहित हवाई वाहने असतील. ती जमिनीवरील अत्याधुनिक लढाई तसेच हवाई संरक्षण क्षमतांचे प्रदर्शन घडवतील.

भारतीय नौदल हे नौदलाच्या अँटी शिप क्षेपणास्त्राचे तसेच स्वयंचलित कार्गो वाहक हवाई वाहने आणि विस्तारित लक्ष्यभेदी  यांचे दर्शन घडवतील त्यामुळे भारताची सागरी ताकद आणि तंत्रज्ञानातील आधुनिकतेचे दर्शन घडेल. भारतीय हवाई दल हे स्वदेशात विकसित केलेले कमी वजनाचे लढाऊ विमान तेजस हलक्या वजनाची हेलिकॉप्टर आधुनिक कमी वजनाची हेलिकॉप्टर्स यांचे दर्शन घडवून हवाई ऑपरेशन मधील सामर्थ्य आणि विविधता प्रदर्शित करतील. 

देशाला सध्याच्या तसेच भावी आव्हानांना तोंड देण्यासाठी असलेली जागतिक स्तरावरील भारताची स्वतःची तयारी यातून स्पष्ट दिसून येईल. भारत शक्ती हा सराव भारतीय लष्करी दलाच्या कामामधील पराक्रमाने लष्करी क्षेत्रातील भारताच्या आत्मनिर्भरतेचे तसेच स्वदेशी लष्करी उद्योगांची कर्तबगारी आणि वचनबद्धता यांचे उदाहरण दाखवून देईल.

पंतप्रधान अहमदाबादमध्ये

रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी या बाबतीत महत्त्वाचे पाऊल उचलत प्रधानमंत्री अहमदाबाद मधल्या डीएफसीच्या ऑपरेशन कंट्रोल केंद्रात 85,000 कोटींच्या खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधान रेल्वे कार्यशाळा, लोको शेड्स कोचिंग डेपो फलटण बारामती नवीन रेल्वे मार्ग, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन व्यवस्था आधुनिकीकरण यांची पायाभरणी करतील आणि न्यू खुर्जा ते सेहनवाल या (401Rkm)  पूर्व डी एफ सी वरच्या विभागाचे तसेच न्यू मकरपुरा ते न्यू घोलवड या पश्चिम डीएफसी वरील आणि पश्चिम डीएफसी च्या ऑपरेशन कंट्रोल सेंटरचे राष्ट्रार्पण करतील.

पंतप्रधान अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल , सिकंदराबाद ते विशाखापट्टणम, मैसूर ते डीआर एमजीआर सेंट्रल (चेन्नई),  पटना ते लखनऊ, न्यू जलपायगुडी ते पटना, पुरीते विशाखापट्टणम , लखनऊ ते डेहराडून ,  कलबुर्गी ते सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल  बेंगळुरु, रांची ते  वाराणसी , खजुराहो ते दिल्ली (निजामुद्दीन) या दहा नवीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील

पंतप्रधान चार वंदे भारत ट्रेनच्या विस्तारालाही हिरवा झेंडा दाखवतील.  अहमदाबाद - जामनगर वंदे भारत ट्रेन द्वारकेपर्यंत, अजमेर - दिल्ली सराय रोहिला वंदे भारत ट्रेन चंदिगडपर्यंत, गोरखपूर - लखनौ वंदे भारत ट्रेन प्रयागराजपर्यंत आणि तिरुअनंतपुरम - कासरगोड वंदे भारत ट्रेन मंगळुरुपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. तसेच, आसनसोल - हटिया आणि तिरुपती - कोल्लम स्थानकांदरम्यान दोन नवीन प्रवासी गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.

नवीन खुर्जा जंक्शन, साहनेवाल, नवीन रेवाडी, नवीन किशनगड, नवीन घोलवड आणि नवीन मकरपुरा या विविध ठिकाणांहून समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरमधील मालवाहू गाड्यांना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधान विविध रेल्वे स्थानकावरील 50 प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे राष्ट्राला समर्पित करतील.  ही जन औषधी केंद्रे लोकांना स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण जेनेरिक औषधे उपलब्ध करून देतील.

पंतप्रधान 51 गती शक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल्स राष्ट्राला समर्पित करतील. हे टर्मिनल्स वाहतुकीच्या विविध पद्धती द्वारे मालाच्या विना अडथळा वाहतूकीला प्रोत्साहन देतील.

पंतप्रधान 80 विभागांमधील 1045 Rkm स्वयंचलित सिग्नलिंग राष्ट्राला समर्पित करतील.  या अद्ययावत यंत्रणेमुळे रेल्वे कार्यान्वयनाची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढेल.  पंतप्रधान 2646 स्थानकांवरील, रेल्वे स्थानक डिजिटल नियंत्रण राष्ट्राला समर्पित करतील.  यामुळे रेल्वेची परिचालन कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुधारेल.

पंतप्रधान रेल्वेच्या डब्यात सुरू करण्यात आलेली 35 उपहारगृहे देशाला समर्पित करतील. या रेल्वे कोच उपहारगृहांचे उद्दिष्ट रेल्वे भाड्या व्यतिरिक्त चा महसूल गोळा करणे तसेच प्रवाशांच्या आणि जनतेच्या गरजा पूर्ण, हे आहे.

पंतप्रधान देशभरात पसरलेले 1500 हून अधिक ‘एक स्थानक एक उत्पादन’ स्टॉल राष्ट्राला समर्पित करतील.  हे स्टॉल स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देतील आणि स्थानिक कारागीर आणि व्यवसायांसाठी उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देतील.

पंतप्रधान 975 ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारी केंद्रे आणि इमारती राष्ट्राला समर्पित करतील. या उपक्रमामुळे भारताच्या नवीकरणीय ऊर्जा उद्दिष्टांमध्ये योगदान मिळेल आणि रेल्वेचे कार्बन उत्सर्जन कमी होईल.

पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान, नवीन विद्युतीकृत विभागांचे समर्पण, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि बहुपदरीकरण, रेल्वे गुड्स शेड, कार्यशाळा, लोको शेड्स, पिट लाइन्स आणि कोचिंग डेपो यांचा विकास यासारखे विविध प्रकल्पही राष्ट्राला समर्पित ककरणार आहेत. हे प्रकल्प आधुनिक आणि मजबूत रेल्वे मार्गाचे जाळे तयार करण्याच्या सरकारच्या समर्पणाचा पुरावा आहेत.  या गुंतवणुकीमुळे केवळ संपर्क सुविधाच सुधारणार  नाही तर आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील.

पंतप्रधानांचे साबरमतीमधील कार्यक्रम.

पंतप्रधान साबरमती दौऱ्यात पुनर्विकसित कोचरब आश्रमाचे उद्घाटन करणार आहेत.  1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर महात्मा गांधींनी स्थापन केलेला हा पहिला आश्रम आहे. गुजरात विद्यापीठाने आजही हा आश्रम स्मारक आणि पर्यटनस्थळ म्हणून जतन केला आहे. पंतप्रधान गांधी आश्रम स्मारकाचा मास्टर प्लॅनही प्रकाशित करतील.

महात्मा गांधी ज्या आदर्शांसाठी उभे होते ते जपण्याचा आणि त्यांचे संवर्धन करण्याचा तसेच महात्मा गांधींचे आदर्श दाखवणारे मार्ग विकसित करण्याचा आणि ते आदर्श लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान सतत प्रयत्न करत आहेत.  या प्रयत्नातील आणखी एका पाऊल म्हणजे गांधी आश्रम स्मारक प्रकल्प, हे स्मारक महात्मा गांधींची शिकवण आणि तत्त्वज्ञान पुनरुज्जीवीत करुन सध्याच्या आणि भावी पिढ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करेल.  या मास्टर प्लॅन नुसार आश्रमाचे सध्याचे 5 एकर क्षेत्र 55 एकरांपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. आश्रमात सध्या अस्तित्वात असलेल्या 36 इमारतींचा जीर्णोद्धार केला जाईल, त्यापैकी गांधीजींचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'हृदय कुंज'सह 20 इमारतींचे संवर्धन केले जाईल, 13 इमारतींचा जीर्णोद्धार केला जाईल आणि 3 इमारतींची पुनर्निर्मित केली जाईल.

आश्रमाच्या मास्टर प्लॅनमध्ये गृहप्रशासन सुविधा, अभ्यागत सुविधा जसे की अभिमुखता केंद्र, चरखा कताई आणि त्याच्या सार्वजनिक उपयोगीतेवर संवादात्मक कार्यशाळा, हस्तनिर्मित कागद, खादी विणणे,  चामड्यापासून वस्तूंची निर्मिती यासाठी नवीन इमारती असतील.  या इमारतींमध्ये गांधीजींच्या जीवनातील विविध पैलू तसेच आश्रमाचा वारसा दर्शविण्यासाठी परस्परसंवादी प्रदर्शन आणि इतर अनेक उपक्रम आयोजित केले जातील

आश्रमाच्या मास्टरप्लॅनमध्ये गांधीजींच्या विचारांचे जतन, संरक्षण आणि प्रसार करण्यासाठी वाचनालय आणि अभिलेखागार इमारत तयार करण्याचीही कल्पना आहे. यामुळे आश्रमाला भेट देणाऱ्या विद्वानांना अभ्यास करण्यासाठी ग्रंथालय आणि संग्रहणी ची सुविधा उपलब्ध होईल.  या प्रकल्पामुळे अभ्यागतांना सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या अधिक उत्तेजक आणि समृद्ध अनुभव देणारे, त्यांच्या विविध अपेक्षा पूर्ण  करणारे आणि अनेक भाषांमध्ये मार्गदर्शन करणारे एक केंद्र तयार करणे शक्य होईल.

हे स्मारक भविष्यातील पिढ्यांसाठी एक प्रेरणा म्हणून काम करेल, गांधीवादी विचारांना चालना देईल आणि विश्वस्त तत्त्वांद्वारे सूचित केलेल्या प्रक्रियेद्वारे गांधीवादी मूल्यांचे सार जिवंत करेल.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Waqf Law Has No Place In The Constitution, Says PM Modi

Media Coverage

Waqf Law Has No Place In The Constitution, Says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to participate in ‘Odisha Parba 2024’ on 24 November
November 24, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will participate in the ‘Odisha Parba 2024’ programme on 24 November at around 5:30 PM at Jawaharlal Nehru Stadium, New Delhi. He will also address the gathering on the occasion.

Odisha Parba is a flagship event conducted by Odia Samaj, a trust in New Delhi. Through it, they have been engaged in providing valuable support towards preservation and promotion of Odia heritage. Continuing with the tradition, this year Odisha Parba is being organised from 22nd to 24th November. It will showcase the rich heritage of Odisha displaying colourful cultural forms and will exhibit the vibrant social, cultural and political ethos of the State. A National Seminar or Conclave led by prominent experts and distinguished professionals across various domains will also be conducted.