माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या जीवन आणि कारकीर्दीवरील तीन पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणाली मार्फत केले जाणार आहे.
हा कार्यक्रम 30 जून रोजी दुपारी बारा वाजता, एम. व्यंकय्या नायडू यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हैदराबादमधील गचिबोवली येथील अन्वय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते पुढील पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत.
(i) माजी उपराष्ट्रपतींचे चरित्र “व्यंकय्या नायडू – लाइफ इन सर्व्हिस” हे द हिंदूंच्या हैदराबाद आवृत्तीचे माजी निवासी संपादक एस नागेश कुमार यांनी लिहिलेले पुस्तक.
(ii) “सेलिब्रेटिंग भारत – द मिशन अँड मेसेज ऑफ श्री एम व्यंकय्या नायडू ॲज थर्टींथ प्रेसिडेंट ऑफ इंडिया”, हे उपराष्ट्रपतींचे माजी सचिव डॉ. आय.व्ही. सुब्बाराव यांनी संकलित केलेले फोटो क्रॉनिकल.
(iii) "महानेता - लाईफ अँड जर्नी ऑफ श्री एम. व्यंकय्या नायडू " नावाचे संजय किशोर यांनी लिहिलेले तेलुगु भाषेतील चित्रमय चरित्र.