गुजरातच्या सूरत इथल्या सौराष्ट्र पटेल सेवा समाजाने बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे (मुलांचे वसतिगृह) भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या म्हणजेच, 15 ऑक्टोबर रोजी, सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.

या वसतिगृहात 1500 विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होऊ शकते. यात एक मोठे सभागृह आणि एक विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालयही आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या वसतिगृहाचे बांधकाम,(मुलींचे वसतिगृह) पुढच्या वर्षी सुरु होणार असून, त्यात 500 मुलींच्या निवासाची व्यवस्था होऊ शकते. 

सौराष्ट्र पटेल सेवा समाजाविषयी माहिती

ही एक नोंदणीकृत विश्वस्त संस्था असून तिची स्थापना 1983 साली झाली आहे. या संस्थेचे मूळ उद्दिष्ट, दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तन घडवणे हे आहे. ही संस्था, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करते. तसेच, स्वयंउद्यमशीलता आणि कौशल्य विकासासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते.

गुजरातचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

 

  • SHRI NIVAS MISHRA January 15, 2022

    हम सब बरेजा वासी मिलजुल कर इसी अच्छे दिन के लिए भोट किये थे। अतः हम सबको हार्दिक शुभकामनाएं। भगवान इसीतरह बरेजा में विकास हमारे नवनिर्वाचित माननीयो द्वारा कराते रहे यही मेरी प्रार्थना है।👏🌹🇳🇪
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
11 years on, Bharat is stronger and more inclusive

Media Coverage

11 years on, Bharat is stronger and more inclusive
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 जून 2025
June 17, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Leadership Ensuring Growth From Clean Energy to Global Trade