पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 जून 2023 रोजी दिल्ली विद्यापीठ क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय सभागृहात सकाळी 11 वाजता दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात सहभागी होतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
विद्यापीठाच्या उत्तर प्रांगणात बांधल्या जाणाऱ्या दिल्ली विद्यापीठाच्या संगणक केंद्र, तंत्रज्ञान विद्याशाखा आणि शैक्षणिक विभागाच्या इमारतीची पायाभरणी देखील पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान करतील.
दिल्ली विद्यापीठाची स्थापना 1 मे 1922 रोजी झाली. गेल्या शंभर वर्षांत, विद्यापीठाचा प्रचंड विकास आणि विस्तार झाला आहे. विद्यापीठा अंतर्गत आता 86 विभाग, 90 महाविद्यालये, 6 लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. राष्ट्र उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे.