ऐतिहासिक बोडो करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानिमित्त आसाममधल्या कोक्राझार इथे 7 फेब्रुवारीला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
बीटीएडी, बोडोलॅन्ड प्रादेशिक क्षेत्र जिल्ह्यांसह संपूर्ण आसाम मधून 4 लाखाहून अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा अंदाज आहे. राज्यातली सांस्कृतिक विविधता दर्शवणारा कार्यक्रमही यावेळी सादर होईल.
यावर्षाच्या जानेवारी महिन्यात 27 तारखेला ऐतिहासिक बोडो करारावर नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या झाल्या.
हा भारतासाठी अतिशय विशेष दिवस असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे. या करारामुळे बोडो जनतेसाठी शांतता सलोख्याची नवी पहाट उगवेल असेही त्यांनी म्हटले आहे.
सबका साथ सबका विकास या धोरणाला अनुसरुन आणि ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वंकष विकासाच्या कटिबद्धता लक्षात घेऊन हा करार करण्यात आला आहे.
एनडीएफबीच्या विविध गटातल्या 1615 जणांनी शस्त्रांस्त्रांसह शरणागती स्वीकारली.
बोडो गटांसमवेत झालेल्या करारामुळे बोडो जनतेच्या वौशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचेही जतन होणार आहे.
विकासाच्या अनेक उपक्रमांचा लाभ घेण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे. बोडो जनतेच्या मदतीसाठी आवश्यक सर्व गोष्टी करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरमधे म्हटले आहे.
या भागाच्या विकासासाठी 1500 कोटी रुपयांचे विशेष पॅकेजला अंतिमरुप देण्यात आले आहे.
भारत सरकार, मिझोरम, त्रिपुरा राज्य सरकार यांच्यात नुकताच ब्रु रियांग करार झाला आहे. याचा 35,000 ब्रु-रियांग शरणार्थींना लाभ झाला. त्रिपुरामध्ये एनएलएफटीच्या 85 केडरनी आत्मसमर्पण केले.
हिंसेच्या मार्गावरुन चालणाऱ्यांनी शस्त्रास्त्र खाली टाकून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची हाक, पंतप्रधानांनी प्रजासत्ताक दिनी, मन की बात या कार्यक्रमात दिली होती.