पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी ताज पॅलेस हॉटेल, नवी दिल्ली येथे संध्याकाळी 6:30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या कौटिल्य आर्थिक परिषदेत सहभागी होतील.यावेळी ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
कौटिल्य आर्थिक परिषदेची ही तिसरी परीषद असून ती 4ते 6 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या वर्षीच्या परीषदेत हरित संक्रमणासाठी वित्तपुरवठा, भौगोलिक-आर्थिक विखंडन आणि विकासाचे परिणाम, शाश्वत परीणामकता टिकवून ठेवण्यासाठी धोरणात्मक कारवाईची तत्त्वे यासारख्या संकल्पनांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
या परिषदेत भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील या विषयातील तज्ञ आणि धोरणकर्ते भारतीय अर्थव्यवस्था आणि दक्षिण जागतिक अर्थव्यवस्थांना भेडसावणाऱ्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. जगभरातील वक्ते या परीषदेत सहभागी होतील.
केंद्रीय वित्त मंत्रालय आणि आर्थिक विकास संस्थेच्या सहकार्याने कौटिल्य आर्थिक परिषदेचे आयोजन केले जात आहे.