पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 2 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता आयआयएम संबळपूरच्या येथील कायमस्वरूपी कॅम्पसची व्हिडीओ काॅन्फरन्सिंद्वारे पायाभरणी करतील
राज्यपाल आणि ओदिशाचे मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय मंत्री श्री. रमेश पोखरीयाल नि:शंक,श्री. धर्मेंद्र प्रधान आणि श्री. प्रताप चंद्र सारंगी हे देखील याप्रसंगी उपस्थित रहाणार आहेत. अधिकारी, उद्योगधुरीण, शिक्षणतज्ञ, माजी विद्यार्थी, आणि विविध विद्याशाखांतील प्राध्यापकांसह विद्यार्थी असे सुमारे 5000 आमंत्रित या दृकश्राव्य माध्यमाद्वारे होणाऱ्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
आयआयएम संबळपूर बद्दल
आयआयएम संबळपूर ही दुहेरी पध्दत कार्यरत करणारी भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) असून मूलभूत संकल्पना डिजिटल माध्यमाद्वारे शिकविणारी आणि प्रायोगिक शिक्षण उद्योग क्षेत्राच्या सहकार्याद्वारे देणारी शिक्षणसंस्था आहे. या संस्थेने आपल्या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या ( 2019-21 च्या तुकडीत) 49% विद्यार्थिनी तर ( 2020-22च्या तुकडीत) 43% विद्यार्थिनींना प्रवेश देत,आपली उच्च लैंगिक विविधता दर्शवित, इतर भारतीय व्यवस्थापन संस्थांना मागे टाकले आहे.