पंतप्रधान येत्या 29 फेब्रुवारीला चित्रकूट इथल्या बुंदेलखंड महामार्गाचे उदघाटन करणार आहेत. हा महामार्ग उत्तरप्रदेश संरक्षण औदयोगिक पट्ट्यातल्या भागांना एकमेकांशी जोडेल. हा महामार्ग चित्रकूट,बांदा ,हमीरपूर,आणि जालौन जिल्ह्यातून जाणार आहे. तसेच हा महामार्ग बुंदेलखंड भागाला आग्रा-लखनौ आणि यमुना महामार्गाने राजधानी दिल्लीला जोडण्यासाठी महत्वाचा मार्ग ठरेल.
296 किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे चित्रकूट, बांदा, माहोबा, हमीरपूर, जालौन, ओराइयः , एतावाह या जिल्ह्यांना फायदा होईल.
देशाला 2025 सालापर्यंत जमिनीवरील उपकरणे,पाणबुड्या ,हेलिकॉप्टर्स, हवाई अस्त्रे अशा सरंक्षक आणि संदेशवहन सामुग्रीची आवश्यकता भासणार आहे..त्याची अंदाजे किंमत अडीचशे अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे..
यासाठी लखनौ येथे 21 फेब्रुवारीला झालेल्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत सरकारने उत्तरप्रदेशात संरक्षण औद्योगिक पट्टा उभारण्याची घोषणा केली होती
केंद्रसरकारने सुरुवातीला सहा ठिकाणी अशी केंद्रे सुरु करण्याचे ठरविले आहे. यापैकी बुंदेलखंडातल्या झाशी आणि चित्रकूट येथील काम प्रगतीपथावर आहे. यासाठी बिगरशेतजमीन संपादित केली आहे. गरीब शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे.
शेतकरी उत्पादन संस्था –उद्घाटन
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी देशभरातील दहा हजार शेतकरी उत्पादन संस्थांचे त्या दिवशी उदघाटन करणार आहेत.
देशातल्या 86 टक्के शेतकऱ्यांकडे 1.1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाबद्दल माहिती, उत्तम बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा सहज उपलब्ध होत नाही. तसेच त्यांची आर्थिक स्थितीदेखील कमकुवत असते. एफपीओ द्वारा अशा शेतकऱ्यांना मदत केली जाईल. शेतकऱ्यांचे उत्त्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी ७ हजार अशा संस्था सुरु करण्याची शिफारीश केली गेली. परंतु केंद्र सरकारने हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अशा 10 हजार संस्था सुरु करण्याचे योजिले आहे.फळबागांसाठी सरकारने 2020-21 च्या अर्थसंकल्पात समूह पद्धत अंगीकारून एक जिल्हा एक उत्पादन करून त्याच्या विपणन आणि निर्यात करण्याचा विचार मांडला आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नव्या केंद्रीय योजनेअंतर्गत 10 हजार शेतकरी उत्पादन संस्था सुरु करण्याचे योजिले आहे.