Quoteपारंपारिक व्यवसायातील कारागिरांना पाठिंबा देणे आणि त्यांना कौशल्य प्रदान करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातून ही योजना प्रेरित आहे
Quote13,000 कोटी रुपयांच्या खर्चासह 'पीएम विश्वकर्मा' योजनेला केंद्र सरकार कडून संपूर्ण निधी दिला जाईल
Quote'पीएम विश्वकर्मा' ची विस्तृत व्याप्ती - अठरा हस्तकला समाविष्ट असतील
Quoteपीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे कुशल कारागिरांना दिली जाणार ओळख
Quoteविश्वकर्मांना कौशल्य विकासासाठी कर्जसहाय्य आणि प्रशिक्षण दिले जाणार

विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर, द्वारका, नवी दिल्ली येथे “पीएम विश्वकर्मा” या नवीन योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

पारंपारिक कला कौशल्याचे काम करणाऱ्या लोकांना पाठिंबा देणे याकडे पंतप्रधानांचे कायमच लक्ष असते. कौशल्यपूर्ण निर्मिती करणाऱ्या आणि हस्तव्यवसायातील कारागिरांना केवळ आर्थिक मदत करण्याच्या आकांक्षेनेच नव्हे तर आपली प्राचीन परंपरा, संस्कृती आणि वैविध्यपूर्ण वारसा जतन करण्याच्या भावनेनेही प्रेरित आहे.

13,000 कोटी रुपयांच्या खर्चासह 'पीएम विश्वकर्मा' योजनेला केंद्र सरकार कडून संपूर्ण निधी दिला जाईल. या योजनेंतर्गत, बायोमेट्रिक आधारे पीएम विश्वकर्मा पोर्टल वापरून विश्वकर्मांची सामान्य सेवा केंद्रांद्वारे विनामूल्य नोंदणी केली जाईल. तसेच त्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणासह कौशल्य वृध्दिंगत करणे, 15,000 रुपये साधनसामग्री प्रोत्साहन,1 लाख रुपये (पहिला हप्ता) आणि 2 लाख रुपये (दुसरा हप्ता) पर्यंत 5% सवलतीच्या व्याजदराने मुक्त अर्थसहाय्यास मान्यता दिली जाईल तसेच डिजिटल व्यवहार आणि विपणन करण्याच्या समर्थनासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

या योजनेचे उद्दिष्ट गुरु-शिष्य परंपरा किंवा विश्वकर्मांद्वारे त्यांच्या हातांनी आणि साधनांनी काम करत असलेल्या पारंपारिक कौशल्यांच्या कुटुंब -आधारित व्यवसायाला बळकट करणे हे आहे. पीएम विश्वकर्मा योजनेचे मुख्य लक्ष्य गुणवत्ता सुधारणे तसेच कारागीर आणि त्यांची उत्पादने आणि सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्या देशांतर्गत आणि जागतिक मूल्य शृंखलांशी एकरूप होतील,याची खात्री करणे हे आहे.

ही योजना संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीर आणि हस्तव्यवसायिकांना मदत करेल. पीएम विश्वकर्मा अंतर्गत अठरा पारंपारिक कलाकुसरीच्या व्यवसायांचा समावेश केला जाईल. यामध्ये (i) सुतार (ii) होडी बांधणी कारागीर (iii) चिलखत बनवणारे (iv) लोहार (v) हातोडी आणि अवजार संच बनवणारे (vi) कुलूप बनवणारे (vii) सोनार (viii) कुंभार (ix) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे) (x) चर्मकार (पादत्राणे कारागीर) (xi) मेस्त्री (xii) टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर (xiii) बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे (xiv) न्हावी (केश कर्तनकार) (xv) फुलांचे हार बनवणारे कारागीर (xvi) परीट (धोबी) (xvii) शिंपी आणि (xviii) मासेमारचे जाळे विणणारे इत्यादी पारंपारीक व्यवसाय समाविष्ट आहेत.

 

  • Jitendra Kumar May 19, 2025

    🙏🙏
  • Vívek Paturakar March 28, 2024

    viswakarma yojana sabhi ko di jarahi par isaka labh karagiro ko nahi mil raha ho karagiro nahi o labh utha rahe or karagiro ke hat kuch nahi aa raha is yojana ki barakai se jyach kare
  • Babla sengupta December 31, 2023

    Babla sengupta
  • Mahendra singh Solanki Loksabha Sansad Dewas Shajapur mp December 09, 2023

    नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो
  • Tilwani Thakurdas Thanwardas November 12, 2023

    दीपावली की की शुभकामनाएं देते हैं👌👌👌👌👌
  • Tilwani Thakurdas Thanwardas November 11, 2023

    तेलंगाना राज्य में सफेद राशन कार्ड धारकों को लेकर के कहना है कि इनको आप जितना लाभ देंगे तो आपके वोट में भी बहुत हिजाबे होने की संभावना रहती है👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
  • Tilwani Thakurdas Thanwardas November 10, 2023

    मोदीजी का मकसद है कि देश में से गरीबी रेखा के रहने वाले लोगों को भी ऐसे स्थान पर लाना है जिससे वह भी भूलें की गरीबी होती किया चीज़ है👍👍👍👍👍👍👍👍इसलिए उन्हें 5 साल के लिए राशन वितरण किया जा रहा है कि वह लोग कुछ रकम जमा करने में सख्यम हो सकता है👌👌👌👌👌👌👌👌👌👌
  • Tilwani Thakurdas Thanwardas November 09, 2023

    विरोधियों में किसी के पास भी इतना सा भी दम नहीं है कि मोदीजी का मुकाबला करने में सख्यम हो👍👍👍👍👍👍👍👍
  • Tilwani Thakurdas Thanwardas November 09, 2023

    देश सेवा सीखनी है तो वह सिर्फ मोदीजी से सीखी जा सकती है👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
  • Tilwani Thakurdas Thanwardas November 08, 2023

    विदेश जो भी काला धन है अब वह एक देश से दूसरे देश में घूमने में लगा हुआ है और मोदीजी की नज़रों में आते जा रही है और 2024 के बाद में ही एक बम की तरह फट सकता है और वापस लाने में कोई भी तकलीफ नहीं हो सकती है👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India flash PMI surges to 65.2 in August on record services, mfg growth

Media Coverage

India flash PMI surges to 65.2 in August on record services, mfg growth
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chairman and CEO of Kyndryl, Mr Martin Schroeter meets Prime Minister Narendra Modi
August 21, 2025

Chairman and CEO of Kyndryl, Mr Martin Schroeter meets Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi. The Prime Minister extended a warm welcome to global partners, inviting them to explore the vast opportunities in India and collaborate with the nation’s talented youth to innovate and excel.

Shri Modi emphasized that through such partnerships, solutions can be built that not only benefit India but also contribute to global progress.

Responding to the X post of Mr Martin Schroeter, the Prime Minister said;

“It was a truly enriching meeting with Mr. Martin Schroeter. India warmly welcomes global partners to explore the vast opportunities in our nation and collaborate with our talented youth to innovate and excel.

Together, we all can build solutions that not only benefit India but also contribute to global progress.”