पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली येथील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, येथून 'कर्मयोगी सप्ताह' या राष्ट्रीय अध्ययन सप्ताहाचा शुभारंभ करतील.
मिशन कर्मयोगी या उपक्रमाचा आरंभ सप्टेंबर 2020 मध्ये झाला,आणि तेव्हापासून त्यात निरंतर प्रगती झाली आहे हे जागतिक परिप्रेक्ष्यांच्या पार्श्वभूमीवर,भविष्यासाठी आपल्या आचार-विचारांमध्ये रुजलेल्या,नागरी सेवांच्या संकल्पनांना अधोरेखित करते.
राष्ट्रीय अध्ययन सप्ताह (नॅशनल लर्निंग वीक,NLW) हा भारतीय प्रशासकीय सेवकांसाठी वैयक्तिक आणि संस्थात्मक क्षमतांचा विकास करण्यासाठी नव्या प्रेरणा देणारा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असेल.हा उपक्रम अध्ययनाच्या आणि विकासाच्या नवीन बांधिलकीला चालना देईल. राष्ट्रीय अध्ययन सप्ताहाचे उद्दिष्ट "एक सरकार" ही भावना अधोरेखित करणे,हा असून त्याद्वारे प्रत्येकाला राष्ट्रीय उद्दिष्टांसह संरेखित करून आजीवन शिक्षणप्राप्त करण्यास प्रोत्साहन मिळेल.
वैयक्तिक सहभागासह मंत्रालये, विभाग आणि संस्थांद्वारे विविध प्रकारच्या सहभागातून शिकण्यासाठी राष्ट्रीय अध्ययन सप्ताह समर्पित असेल. यादरम्यान, प्रत्येक कर्मयोगी किमान 4 तासांच्या सक्षमतेशी संबंधित प्रशिक्षणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वचनबद्ध असेल आणि त्यात प्रतिष्ठित व्यक्तींद्वारे iGOT, चर्चासत्रे (सार्वजनिक व्याख्याने/धोरण प्रशिक्षण ) यावरील वैयक्तिक मॉड्यूल्सच्या मिश्रणाद्वारे सहभागी लक्ष्यित तास पूर्ण करू शकतील. या सप्ताहादरम्यान, पख्यातनाम वक्ते त्यांच्या विशिष्ट महत्त्वाच्या क्षेत्रांवर भाषणे देतील आणि त्यांना अधिक प्रभावी पद्धतीने नागरिक-केंद्री बनवत त्यांचा सहभाग नोंदविण्यासाठी कार्य करतील. सप्ताहादरम्यान, मंत्रालये, विभाग आणि संस्था विशिष्ट क्षमता वाढविण्यासाठी चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित होणार आहेत.