पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या निवासस्थानी 7 एलकेएम येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी ) पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील.
नवोन्मेष, समाजसेवा, शैक्षणिक, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य या सहा श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भारत सरकार या मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करत आहे . प्रत्येक पुरस्कार विजेत्याला पदक, रोख रु. 1 लाख आणि प्रमाणपत्र दिले जाते.यावर्षी, बाल शक्ती पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये देशभरातील 11 मुलांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार -2023 साठी निवड झाली आहे.पुरस्कार विजेत्यांमध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे.