पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस सेवेच्या (प्रोबेशनर्स )अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते त्यांच्याशी संवादही साधतील.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची उपस्थिती असणार आहे.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी ( SVPNPA) बद्दल
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA) ही देशातील प्रमुख पोलीस प्रशिक्षण संस्था आहे. भारतीय पोलिस सेवेतल्या अधिकाऱ्यांना ती प्राथमिक स्तरावर प्रशिक्षित करते आणि आयपीएस अधिकाऱ्यांसाठी सेवांसंबंधित विविध अभ्यासक्रम आयोजित करते.