गोव्यातील 100 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देऊन हा टप्पा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 18 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
लसीकरणाचा यशस्वी टप्पा गाठण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांमध्ये ,सामुदायिक एकजूट आणि लसीकरण तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी टीका उत्सव चे यशस्वी आयोजन, कामाच्या ठिकाणी लसीकरण, वृद्धाश्रम, दिव्यांगजन इत्यादी प्राधान्य गटांसाठी विशेष लसीकरण मोहीम आणि लसीसंदर्भात लोकांमधील शंका आणि भीती दूर करण्यासाठी समुदायांशी सतत संवाद साधणे याचा समावेश आहे. तौते चक्रीवादळासारख्या आव्हानांवर मात करत राज्याने लसीकरणाची व्याप्ती वेगाने वाढवणे सुनिश्चित केले.
या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.