पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील कोविड -19 लसीकरण कार्यक्रमात सहभागी झालेले आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी 6 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
हिमाचल प्रदेशने संपूर्ण पात्र लोकसंख्येला कोविड लसीकरणाची पहिली मात्रा देण्याचा टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहे. या राज्याने यासाठी केलेल्या प्रयत्नात दुर्गम प्रदेशातील विभागांना दिलेले प्राधान्य, सार्वत्रिक जागृतीसाठी घेतलेला पुढाकार, आणि आशा कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरी दिलेल्या भेटी अशा अनेक प्रयत्नांचा समावेश आहे. स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्ती , दिव्यांग व्यक्ती, औद्योगिक कामगार, रोजंदारी कर्मचारी अशा व्यक्तींच्या लसीकरणावर राज्याने विशेष लक्ष पुरवले आणि त्यांच्यासाठी 'सुरक्षा की युक्ती करोना से मुक्ती' यासारख्या विशेष मोहिमा राबवून संपूर्ण लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य केले.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री या प्रसंगी उपस्थित असतील.