21 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाराणसीतील डॉक्टर्स, निमवैद्यकीय कर्मचारी आणि आघाडीवरील अन्य कोरोनायोद्ध्यांशी संवाद साधणार आहेत.
वाराणसीतील विविध कोविड रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा पंतप्रधान घेणार आहेत. यामध्ये डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था व भारतीय लष्कर यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून नुकत्याच स्थापन केलेल्या पंडित राजन मिश्रा कोविड रुग्णालयाचाही अंतर्भाव आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य बिगर-कोविड रुग्णालयांच्या कामकाजाचीही पाहणी ते करणार आहेत.
सध्या सुरु असलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी वाराणसीमध्ये सुरु असलेल्या प्रयत्नांची तसेच भविष्यासाठीच्या तयारीचीही चर्चा पंतप्रधान यावेळी करणार आहेत.