पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 6 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी साडेबारा वाजता स्वामित्व योजनेच्या मध्य प्रदेशातील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. पंतप्रधान याप्रसंगी, स्वामित्व योजनेच्या 1 लाख 71 हजार लाभार्थ्यांना त्यांच्या मालकीच्या मालमत्तांची ई-मालमत्ता पत्रे देखील वितरीत करतील.
या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
स्वामित्व योजनेविषयी:-
स्वामित्व ही केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाची मध्यवर्ती क्षेत्र योजना असून ग्रामीण भागात स्थायिक असणाऱ्या रहिवाशांना त्यांच्या मालमत्तांचे मालकी हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. कर्ज घेणे तसेच इतर आर्थिक लाभांचा फायदा घेण्यासाठी शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच गावकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या स्थावर मालमत्तेचा आर्थिक मालमत्ता म्हणून वापर करता येण्याचा मार्ग यामुळे निर्वेध झाला आहे. अत्याधुनिक ड्रोनच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील राहत्या घरांचे सीमांकन करून घेणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमुळे देशातील ड्रोन उत्पादन क्षेत्राला देखील मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.
मध्य प्रदेश के ग्रामीण क्षेत्रों के हजारों लोग कल ई-प्रॉपर्टी कार्ड के साथ अपनी संपत्ति का मालिकाना हक प्राप्त करेंगे। दोपहर 12.30 बजे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए ऐसे कई लाभार्थियों से संवाद का सुअवसर भी मिलेगा। https://t.co/YhjIzBhaWb
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2021