पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांशी 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
राज्यात योजनेविषयी जनजागृती वाढवण्यासाठी लोकसहभाग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेविषयी (PMGKAY)
पीएमजीकेएवाय ही पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून साकारण्यात आलेली अन्नसुरक्षा कल्याणकारी योजना आहे, ज्याद्वारे कोविड-19 चा प्रभाव कमी करण्यासाठी सहकार्य आणि मदत पुरवली जाते. पीएमजीकेएवाय अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 5 किलो अतिरिक्त अन्नधान्य दिले जाते.
कार्यक्रमासाठी गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असणार आहे.