पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता पीएम स्वनिधी योजनेच्या उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहतील.
कोविड-19 मुळे प्रभावित रस्त्यावरील गरीब विक्रेत्यांना उपजीविका सुरु करण्याबाबत मदत करण्यासाठी 1 जून 2020 रोजी पंतप्रधान फेरीवाले विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) ही योजना सुरू करण्यात आली.
आतापर्यंत या योजनेंतर्गत एकूण 24 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 12 लाखाहून अधिक मंजूर झाले असून सुमारे 5.35 लाख कर्ज वितरित करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश राज्यात 6 लाखाहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापैकी सुमारे 3.27 लाख मंजूर झाले असून 1.87 लाख कर्ज वितरित करण्यात अली आहेत.
उत्तर प्रदेशमधील या योजनेचे लाभार्थी हा संवाद पाहू शकतील, डीडी न्यूजवर देखील याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.