आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 नोव्हेंबर रोजी 2023 दुपारी 4:30 च्या सुमाराला नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडिअम येथे संवाद साधणार आहेत आणि त्यांना संबोधित करणार आहेत.
हा कार्यक्रम पंतप्रधानांकडून, आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी आणि भविष्यातील स्पर्धांसाठी त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न आहे. भारताने आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये 29 सुवर्ण पदकांसह एकूण 111 पदके जिंकली. आशियाई पॅरा गेम्स 2022 मधील एकूण पदकतालिकेत मागील सर्वोत्तम कामगिरीच्या तुलनेत (2018 मध्ये) 54% प्रगती झाली आहे. यंदा जिंकलेली 29 सुवर्णपदके 2018 मध्ये जिंकलेल्या पदकांच्या संख्येच्या जवळपास दुप्पट आहेत.
या कार्यक्रमाला खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी, राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.