पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 21 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवी दिल्लीतील एम्सच्या झज्जर परिसरातील राष्ट्रीय कर्करोग संस्थेमधील (एनसीआय) इन्फोसिस फाउंडेशन विश्राम सदनाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून, इन्फोसिस फाउंडेशनने 806 खाटांचे विश्राम सदन बांधले आहे. कर्करूग्णांसोबत त्यांची काळजी घेणाऱ्यांना बराच काळ राहावं लागतं, त्यांच्यासाठी वातानुकूलित निवासाची सुविधा पुरवली आहे. फाउंडेशनने सुमारे 93 कोटी रुपये खर्च करून हे बांधकाम केले आहे. हे सदन, रुग्णालय आणि एनसीआय बाह्य रुग्ण विभागाच्या (ओपीडी ब्लॉकच्या) अगदी जवळ आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, श्री मनसुख मांडविय, हरियाणाचे मुख्यमंत्री श्री मनोहर लाल खट्टर आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्तीही या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.