Quoteदेशात एक प्रमुख जागतिक सांस्कृतिक उपक्रम विकसित आणि संस्थात्मक करण्यासाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार आयएएडीबी आयोजित
Quoteआयएएडीबी दरम्यान आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित प्रदर्शने
Quoteलाल किल्ल्यावर आत्मनिर्भर भारत सेंटर फॉर डिझाईनचे (एबीसीडी) पंतप्रधान करणार उद्‌घाटन
Quoteव्होकल फॉर लोकल दृष्टीकोनाला बळ देण्यासाठी नवीन डिझाइन्स आणि नवकल्पनांसह कारागीर समुदायांना सक्षम करण्यासाठी एबीसीडी
Quoteपंतप्रधान समुन्नती -विद्यार्थी बिएननेलचेही करणार उद्‌घाटन

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 8 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता लाल किल्ल्यावर आयोजित पहिल्या भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाइन  बिएननेल  (आयएएडीबी )  2023 चे उद्‌घाटन करणार आहेत.  कार्यक्रमादरम्यान   लाल किल्ल्यावरील आत्मनिर्भर भारत डिझाईन केंद्र आणि विद्यार्थी द्वैवार्षिक कार्यक्रम -समुन्नती याचेही उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

व्हेनिस, साओ पावलो, सिंगापूर, सिडनी आणि शारजाह येथील आंतरराष्ट्रीय बिएनालेस प्रमाणे देशात एक प्रमुख जागतिक सांस्कृतिक उपक्रम विकसित करणे आणि त्याला संस्थात्मक स्वरूप देणे हा दृष्टिकोन पंतप्रधानांनी मांडला होता. या दृष्टीच्या अनुषंगाने, संग्रहालयांचा पुनर्शोध , पुनरब्रँडिंग  करणे, नूतनीकरण करणे आणि संग्रहालये नव्या ठिकाणी स्थापन करणे यासाठी देशव्यापी मोहीम सुरु करण्यात आली.तसेच कोलकाता, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि वाराणसी या भारतातील पाच शहरांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रांच्या विकासाची घोषणा करण्यात आली. याची सुरुवात   भारतीय कला , वास्तुकला  आणि डिझाईन बिएननेल च्या माध्यमातून दिल्ली येथील सांस्कृतिक क्षेत्रातून होणार आहे.

भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाइन  बिएननेलचे आयोजन 9 ते 15 डिसेंबर 2023 दरम्यान लाल किल्ला, नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नुकत्याच  आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन  (मे 2023) आणि ग्रंथालयांचा महोत्सव (ऑगस्ट 2023) यांसारख्या प्रमुख उपक्रमांनंतर आयोजित करण्यात आला आहे.  कलाकार, वास्तुविशारद, डिझायनर, छायाचित्रकार, संग्राहक, कला व्यावसायिक आणि लोक यांच्यात सांस्कृतिक संवाद बळकट  करण्यासाठी सर्वांगीण संवाद  सुरू करण्याच्या अनुषंगाने आयएएडीबीची रचना करण्यात आली आहे.  हे विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून कला, वास्तुकला आणि डिझाइनच्या निर्मात्यांसह विस्तार आणि सहयोगाचे  मार्ग आणि संधी देखील प्रदान करेल.

आयएएडीबी आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या संकल्पनेवर  आधारित प्रदर्शने प्रदर्शित करेल.

  • पहिला दिवस: प्रवेश- राईट ऑफ पॅसेज  : भारतातील दरवाजे
  • दुसरा दिवस  : बाग ए बहार: गार्डन्स एज युनिव्हर्स: भारतातील बागा
  • तिसरा दिवस : संप्रवाह:  समुदायांचा संगम: भारतातील बारव
  • चौथा दिवस : स्थापत्य: अँटी फ्रेजील अल्गोरिदम: भारतातील मंदिरे
  • पाचवा दिवस : विस्मय: क्रिएटिव्ह क्रॉसओवर: स्वतंत्र भारतातील वास्तुरचनेतील आश्चर्य
  • सहावा दिवस:  देशज भारत डिझाईन: देशी रचना
  • सातवा दिवस : समत्व: शेपिंग द बिल्ट : वास्तुकलेमधील  महिलांच्या योगदानाचा उत्सव

आयएएडीबीमध्ये वरील संकल्पनांवर  आधारित दालने ,परिसंवाद , कला कार्यशाळा, कला बाजार, हेरिटेज वॉक आणि समांतर विद्यार्थी बिएननेल यांचा समावेश असेल. ललित कला अकादमीमध्ये आयोजित  विद्यार्थी बिएननेल (समुन्नती) विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य प्रदर्शित करण्याची, अन्य विद्यार्थी आणि व्यावसायिकांशी संवाद साधण्याची आणि   वास्तू स्तुविशारद  समुदायामध्ये डिझाईन स्पर्धा, वारसा प्रदर्शन,  इन्स्टॉलेशन डिझाईन्स, कार्यशाळा इत्यादीद्वारे मौल्यवान संधी मिळवण्याची संधी प्रदान करेल.आयएएडीबी 23 हा देशासाठी एक महत्वाचा  क्षण ठरणार आहे कारण तो भारताला बिएननेल आयोजित होणाऱ्या देशांच्या यादीत  प्रवेश देणार आहे .

पंतप्रधानांच्या ‘व्होकल  फॉर लोकल’ या संकल्पनेनुसार लाल किल्ल्यावर ‘आत्मनिर्भर भारत सेंटर फॉर डिझाईन’ उभारण्यात येत आहे. हे भारतातील अद्वितीय आणि स्वदेशी कलाकुसरीचे दर्शन घडवेल.   आणि कारीगर आणि डिझाइनर यांच्यात सहकार्य प्रदान करेल शाश्वत सांस्कृतिक अर्थव्यवस्थेचा मार्ग प्रशांत करून कारागीर समुदायांना नवीन डिझाइन आणि नवकल्पनांसह सक्षम करेल.

 

  • Ram Raghuvanshi February 26, 2024

    Jay shree Ram
  • Monojit halder February 10, 2024

    jay shree ram 🚩🚩🚩🙏
  • kripadhawale February 09, 2024

    👍👍👍👍
  • Dipak Dwebedi February 07, 2024

    राम हमारे गौरव के प्रतिमान हैं राम हमारे भारत की पहचान हैं राम हमारे घट-घट के भगवान हैं राम हमारी पूजा हैं अरमान हैं राम हमारे अंतरमन के प्राण हैं
  • Amit Kumar debsharma February 06, 2024

    Joy Shree Ram
  • Ranjit Sarkar February 01, 2024

    🙏🙏🙏
  • Ranjit Sarkar February 01, 2024

    🙏🙏
  • Ranjit Sarkar February 01, 2024

    🙏🙏
  • Rajesh Nagar January 31, 2024

    Jai ho
  • Dr Guinness Madasamy January 23, 2024

    BJP seats in 2024 lok sabha election(My own Prediction ) Again NaMo in Bharat! AP-10, Bihar -30,Gujarat-26,Haryana -5,Karnataka -25,MP-29, Maharashtra -30, Punjab-10, Rajasthan -20,UP-80,West Bengal-30, Delhi-5, Assam- 10, Chhattisgarh-10, Goa-2, HP-4, Jharkhand-14, J&K-6, Orissa -20,Tamilnadu-5
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
What Happened After A Project Delayed By 53 Years Came Up For Review Before PM Modi? Exclusive

Media Coverage

What Happened After A Project Delayed By 53 Years Came Up For Review Before PM Modi? Exclusive
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the passing of Shri Fauja Singh
July 15, 2025

Prime Minister Shri Narendra Modi today condoled the passing of Shri Fauja Singh, whose extraordinary persona and unwavering spirit made him a source of inspiration across generations. PM hailed him as an exceptional athlete with incredible determination.

In a post on X, he said:

“Fauja Singh Ji was extraordinary because of his unique persona and the manner in which he inspired the youth of India on a very important topic of fitness. He was an exceptional athlete with incredible determination. Pained by his passing away. My thoughts are with his family and countless admirers around the world.”