
सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात 28 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्षपूर्ती सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्षपूर्ती सोहळ्याचे उदघाटन करताना, पंतप्रधान, नागरिक-केंद्रित माहिती आणि तंत्रज्ञान उपक्रमांचा प्रारंभ करतील. यात डिजिटल सर्वोच्च न्यायालय अहवाल (डीजी एससीआर), डिजिटल न्यायालय 2.0 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन संकेतस्थळाचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.