Quoteनवी दिल्लीत भारत मंडपम इथे भारत 12 ते 14 डिसेंबर 2023 दरम्यान जीपीएआय ही तीन दिवसीय वार्षिक शिखर परिषद करणार आयोजित
Quoteजीपीएआय 29 सदस्य देशांचा हा एक बहुपक्षीय उपक्रम असून, त्याअंतर्गत अत्याधुनिक संशोधन आणि एआय च्या वापराशी संबंधित उपक्रम प्राधान्याने केले जातात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी, संध्याकाळी पाच वाजता, नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेकृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे.

जीपीएआय हा 29 सदस्य देशांचा बहुपक्षीय उपक्रम आहे, ज्याचा उद्देश, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयातील पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षात वापर यातील तफावत भरून काढणे, आणि एआय शी संबंधित प्राधान्ये तसेच, संशोधनाला पाठिंबा देणे, असा आहे. 2024 साली भारताकडे जीपीएआयचे अध्यक्षपद आहे. 2020 साली स्थापन झालेल्या जीपीएआयच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, जीपीएआयचे समर्थक अध्यक्ष आणि 2024 मध्ये जीपीएआयचे प्रमुख अध्यक्ष म्हणून भारत 12 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत वार्षिक जीपीएआय शिखर परिषदेचे आयोजन करत आहे

या शिखर परिषदेदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा प्रशासन आणि एम. एल. कार्यशाळा यासारख्या विविध विषयांवर अनेक सत्रे आयोजित केली जातील शिखर परिषदेतील इतर आकर्षणांमध्ये संशोधन परिसंवाद, एआय गेमचेंजर्स पुरस्कार आणि इंडिया एआय प्रदर्शन यांचा समावेश आहे.

या शिखर परिषदेत देशभरातील 50 हून अधिक जीपीएआय तज्ञ आणि 150 हून अधिक वक्त्यांचा सहभाग असेल.  याव्यतिरिक्त, इंटेल, रिलायन्स जिओ, गुगल, मेटा, एडब्ल्यूएस, योट्टा, नेटवेब, पेटीएम, मायक्रोसॉफ्ट, मास्टरकार्ड, एनआयसी, एसटीपीआय, इमर्स, जिओ हॅप्टिक, भाषिणी यासह विविध कार्यक्रमांमध्ये जगभरातील आघाडीचे एआय गेमचेंजर्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता च्या मदतीने आमूलाग्र बदल घडवणारे तंत्रज्ञ सहभागी होतील. याव्यतिरिक्त, युवा एआय उपक्रम आणि स्टार्ट-अप्स अंतर्गत विजेते असलेले विद्यार्थी त्यांचे एआय मॉडेल आणि त्यांच्या मदतीने समस्यांवरील उपाय या प्रदर्शनात मांडले जातील.

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Indian IPOs set to raise up to $18 billion in second-half surge

Media Coverage

Indian IPOs set to raise up to $18 billion in second-half surge
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 जुलै 2025
July 11, 2025

Appreciation by Citizens in Building a Self-Reliant India PM Modi's Initiatives in Action