पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा मधील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन करतील.यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.
सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासात भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे.या स्वप्नपूर्तीसाठी, 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान “सेमिकंडक्टर क्षेत्राच्या भविष्याला आकार देणे” या संकल्पनेवर आधारित सेमीकॉन इंडिया 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
11 ते 13 सप्टेंबर दरम्यान भरणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेत भारताची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण प्रदर्शित केले जाईल ज्यामध्ये भारताला सेमीकंडक्टर क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्याची संकल्पना आहे. या परिषदेत सेमीकंडक्टर क्षेत्रातील जागतिक स्तरावरील दिग्गज उपस्थित राहणार असून ही परिषद जागतिक नेते, कंपन्या, सेमीकंडक्टर उद्योगातील तज्ञांना एकत्र आणेल.या परिषदेत 250 हून अधिक प्रदर्शक आणि 150 वक्ते सहभागी होणार आहेत.