ओडिशतल्या कटक इथल्या प्राप्तीकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या (आयटीएटी) अत्याधुनिक कार्यालय आणि निवासी संकुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी साडेचार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्री, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, ओडिशाचे मुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीश आणि ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.. आयटीएटीवरील ई-कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे.
आयटीएटी अर्थात आयकर अपीलीय न्यायाधिकरण, प्रत्यक्ष कर क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था असून त्यांचे आदेश अंतिम म्हणून स्वीकारले जातात.
झारखंड उच्च न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) पी.पी. भट्ट, सध्या या न्यायाधिकारणाचे अध्यक्ष आहेत. 25 जानेवारी 1941 रोजी सुरू झालेले आयटीएटी हे देशातील पहिले न्यायाधिकरण आहे आणि ते ‘मदर ट्रिब्यूनल’ या नावाने ओळखले जाते. 1941 मध्ये दिल्ली, बॉम्बे आणि कलकत्ता अशी तीन खंडपीठाने सुरुवात साध्या देशातल्या तीस शहरांमध्ये एकूण
63 खंडपीठ आणि दोन सर्किट खंडपीठ कार्यरत आहेत.
आयटीएटीचे कटक खंडपीठ 23 मे, 1970 रोजी सुरू झाले असून त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण ओडिशात विस्तारले आहे. 50 पेक्षा जास्त वर्ष हे कार्यालय भाडेतत्त्वावरील इमारतीत होते. कटकचे हे नवीन कार्यालय आणि रहिवासी संकुल 2015 मध्ये ओडिशा सरकारने विनामूल्य दिलेल्या 1.60 एकर जमिनीवर बांधण्यात आले आहे.
आहे. एकुन 1938 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या तीन मजली इमारत प्रशस्त कोर्ट कक्ष, अल्ट्रा-मॉडर्न रेकॉर्ड रूम, खंडपीठाच्या सदस्यांसाठी सुसज्ज कक्ष, ग्रंथालय कक्ष, सुसज्ज आधुनिक कॉन्फरन्स हॉल, तसेच आरोपींसाठी पुरेशी जागा, वकील, चार्टर्ड अकाउंटंट्स यांच्या बार रूम आदी सुविधांनी हे संकुल सुसज्ज आहे.