पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 23 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खासदारांसाठी असलेल्या सदनिकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला देखील या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
नवी दिल्ली येथील डॉ. बी डी मार्ग येथे या सदनिका स्थित आहेत. जवळपास 80 वर्षांचे असलेले 8 जुने बंगले, आता 76 नवीन सदनिकांमध्ये पुनर्विकसित करण्यात आले आहेत. मंजूर केलेल्या एकूण रकमेच्या 14 टक्के रक्कम वाचवून आणि कोविड–19 महामारीचा काळ लक्षात घेता अधिक वेळ न दवडता या सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
या सदनिकांच्या निर्मितीच्या वेळी विविध पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे, फ्लाई ऐश आणि बांधकाम आणि पाडलेल्या इमारतींमधील वाया गेलेल्या साधनांपासून तयार करण्यात आलेल्या विटांच्या वापराबरोबरच, थर्मल इन्शुलेशन आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी दुहेरी चमक असलेल्या खिडक्या, पुरेसा प्रकाश देणाऱ्या एलईडी दिव्यांची जोडणी, प्रकाश नियंत्रणासाठी सेन्सर, ऊर्जेचा कमी वापर व्हावा यासाठी व्हीआरव्ही यंत्रणेतील वातानूकुलित यंत्रणा, पाण्याच्या संवर्धनासाठी कमी प्रवाहाच्या जोडण्या, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा आणि छतावरील सौर यंत्रणा यांचा समावेश आहे.