पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 मार्च 2021 रोजी आभासी पद्धतीने ‘मेरीटाईम इंडिया समिट 2021’ चे उद्घाटन करतील.
मेरीटाईम इंडिया समिट 2021 विषयी
बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने 2 मार्च ते 4 मार्च 2021 या कालावधीत www.maritimeindiasummit.in या आभासी व्यासपीठावर ‘मेरीटाईम इंडिया समिट 2021’ चे आयोजन केले आहे.
ही शिखर परिषद भारतीय सागरी क्षेत्रासाठी आगामी दशकाला अनुरूप एक पथदर्शक आराखडा तयार करेल तसेच भारताला जागतिक सागरी क्षेत्रात अग्रस्थानी घेऊन जाण्यासाठी देखील सहाय्य करेल. अनेक देशांतील प्रख्यात वक्ते या परिषदेला उपस्थित राहतील आणि भारतीय सागरी क्षेत्रातील संभाव्य व्यवसाय संधी आणि गुंतवणूकीविषयी अधिक माहिती देतील अशी अपेक्षा आहे. या तीन दिवसीय परिषदेसाठी डेन्मार्क हा भागीदार देश आहे.