पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता दिल्ली मधील तालकटोरा स्टेडियम, येथे ‘बारिसु कन्नड दिम दिमावा’ सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
पंतप्रधानांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला अनुसरून कर्नाटकची संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वैभव साजरे करण्यासाठी ‘बारिसु कन्नड दिम दिमावा’ सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत आयोजित या महोत्सवात शेकडो कलाकारांना नृत्य, संगीत, नाटक, कविता इत्यादी माध्यमातून कर्नाटकचा सांस्कृतिक वारसा दाखवण्याची संधी मिळणार आहे.