पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथे एका भव्य वितरण शिबिरात ज्येष्ठ नागरिक (राष्ट्रीय वयोश्री योजना-आरव्हीवाय) आणि दिव्यांग जनांना (एडीआयपी योजनेअंतर्गत) मदत साधनं आणि उपकरणं वितरित करणार आहेत.
देशातला हे सर्वात मोठे आतापर्यंतचे वितरण शिबिर असून लाभार्थ्यांची संख्या वितरित करण्यात येणाऱ्या उपकरणांची संख्या आणि त्यांची किंमत या सर्वच बाबतीत हे शिबिर उच्चांक नोंदवणार आहे.
या शिबिरात 26 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना 56 हजार मदत साधनं आणि उपकरणं मोफत वितरित केली जाणार आहेत. या उपकरणांचा खर्च 19 कोटींपेक्षा अधिक आहे.
दिव्यांग जन आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, विकासासाठी त्यांना दैनंदिव वापरात साधनं आणि उपकरणांच्या माध्यमातून मदत पुरवणे हा यामागचा उद्देश आहे.