नवी दिल्लीत हॉटेल ताज पॅलेस इथे 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता होत असलेल्या तिसऱ्या 'नो मनी फॉर टेरर' (एनएमएफटी) मंत्रिस्तरीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनपर भाषण करणार आहेत.
ही परिषद 18-19 नोव्हेंबर असे दोन दिवस आयोजित केली आहे. याद्वारे सहभागी राष्ट्रे आणि संघटनांना दहशतवादविरोधी वित्तपुरवठ्यावरील सध्याचा आंतरराष्ट्रीय प्रभाव तसेच नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक पावले यावर विचारविनिमय करण्यासाठी एक अनोखा मंच प्रदान केला जाईल. मागील दोन परिषदांच्या (एप्रिल 2018 मध्ये पॅरिसमध्ये आणि नोव्हेंबर 2019 मध्ये मेलबर्नमध्ये आयोजित) अनुभव आणि त्यातून ते शिकायला मिळाले, त्यावर ही परिषद आधारित असेल. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा नाकारण्यासाठी आणि कारवाईसाठी परवानगी असलेल्या अधिकारक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी जागतिक सहकार्य वाढवण्याच्या दिशेने ती कार्य करेल. यात मंत्री, बहुपक्षीय संस्थांचे प्रमुख आणि वित्तीय कृती दल (एफएटीएफ) शिष्टमंडळांच्या प्रमुखांसह जगभरातील सुमारे 450 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
परिषदेदरम्यान, चार सत्रांमध्ये चर्चा केली जाईल. यात 'दहशतवाद आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा याबाबतचा जागतिक कल', 'दहशतवादासाठी होणाऱ्या निधीपुरवठ्याच्या औपचारिक आणि अनौपचारिक मार्गाचा वापर', 'नवे तंत्रज्ञान आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा' तसेच दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याचा सामना करताना येणारी आव्हाने हाताळण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय सहकार्य' यावर लक्ष केंद्रित केले जाईल.