पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जानेवारी 2022 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या मध्यमातून भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस बैठकीत ‘जागतिक परिस्थिती' या विषयावर विशेष भाषण करणार आहेत.
17 ते 21 जानेवारी 2022 दरम्यान आभासी माध्यमातून कार्यक्रम होणार आहे. जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ; युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुवा वॉन डर लेयन; ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन; इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो; इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अन्य अनेक राष्ट्रप्रमुख भाषण करणार आहेत. या कार्यक्रमात आघाडीचे उद्योग प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्था आणि नागरी समाज प्रतिनिधींचाही सहभाग असेल, या कार्यक्रमातील सहभागी आज जगासमोर असलेल्या गंभीर आव्हानांवर विचारमंथन करतील आणि त्यांना कसे तोंड द्यायचे याबद्दल चर्चा करतील.