दिनांक 15 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात आयोजित केलेल्या आपल्या भेटीदरम्यान, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दुपारच्या 3 वाजण्याच्या सुमारास पुनर्विकसित राणी कमलापती रेल्वे स्टेशन, 2021 चे उद्घाटन करणार आहेत.
गोंड राज्याची शूर आणि निर्भीड राणी कमलापती, हिच्या नावावरून राणी कमलापती रेल्वे स्थानक,हे मध्य प्रदेशातील पहिले जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक, पुनर्विकसित करण्यात आले आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP) पुनर्विकसित, करण्यात आलेल्या या स्थानकाची रचना आधुनिक जागतिक दर्जाच्या सुविधांसह ग्रीन इमारत अशा पध्दतीने केली गेली असून त्यात दिव्यांगजनांना सुलभ रीतीने गतिशील रहाता येईल,हे देखील लक्षात घेतले आहे. हे स्थानक एकात्मिक बहुविध (मल्टी-मोडल) वाहतुकीचे केंद्र म्हणून विकसित केले आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मध्य प्रदेशातील गेज रूपांतरित आणि विद्युतीकृत उज्जैन-फतेहाबाद चंद्रावतीगंज ब्रॉडगेज विभाग, भोपाळ-बरखेरा विभागातील तिसरी लाइन, गेज रूपांतरित आणि विद्युतीकृत माथेला-निमार खेरी ब्रॉड यासह रेल्वेचे अनेक उपक्रम राष्ट्राला समर्पित करतील. गेज विभाग आणि विद्युतीकृत गुणा-ग्वाल्हेर विभाग. उज्जैन-इंदूर आणि इंदूर-उज्जैन दरम्यानच्या दोन नवीन मेमू ट्रेनलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.