पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 22 जानेवारी 2020 रोजी 32 वी ‘प्रगती’ बैठक होणार आहे.
या आधीच्या 31 बैठकांमधून पंतप्रधानांनी 12 लाख कोटींहून अधिक मूल्यांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला आहे. 2019 मध्ये झालेल्या प्रगती बैठकीत 16 राज्ये आणि जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश इथल्या 61,000 कोटी रुपयांच्या 9 प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. परदेशात काम करत असलेल्या भारतीय नागरिकांचे तक्रार निवारण, राष्ट्रीय कृषी बाजार, आकांक्षित जिल्हे, पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम आणि उपक्रम याबाबतही चर्चा झाली.
पंतप्रधानांनी 25 मार्च 2015 रोजी बहुउद्देशीय आणि बहुपद्धत शासन मंच ‘प्रगती’ची सुरुवात केली. सामान्य माणसाच्या तक्रारीची दखल घेण्याच्या उद्देशाने एकात्मिक आणि संवादात्मक हा मंच आहे. केंद्र सरकार तसेच राज्यांच्या महत्वाच्या उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा आढावा आणि देखरेखही ‘प्रगती’ मंचाच्या माध्यमातून होते.