पंतप्रधान नरेंद्र मोदी आयआयटी गुवाहाटीच्या दीक्षांत समारंभाला मंगळवारी 22 सप्टेंबर 2020 ला दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’, केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
687 बीटेक, 637 एमटेक विद्यार्थ्यांसह 1803 विद्यार्थी उद्या पदवी स्वीकारतील.