पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 18 नोव्हेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथील अशोक हॉटेलमध्ये दुपारी 12 वाजता ‘अखंड पत प्रवाह आणि आर्थिक वाढीसाठी समन्वय निर्माण’ या विषयावरील परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करतील.
वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागातर्फे 17-18 नोव्हेंबर 2021 रोजी ही परिषद आयोजित केली आहे. यात मंत्रालये, बँका, वित्तीय संस्था आणि उद्योग प्रतिनिधींचा सहभाग आहे.
यावेळी केंद्रीय अर्थमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.