पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत.
अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 1921 मध्ये सुरू झाली. हे वर्ष पीठासीन अधिकारी परिषदेचे शताब्दी वर्ष म्हणून देखील साजरे केले जात आहे. शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी 25-26 नोव्हेंबर रोजी गुजरातच्या केवडिया येथे दोन दिवसीय परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. “विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यात सुसंवाद समन्वय- जोशपूर्ण लोकशाहीची गुरुकिल्ली.” ही या वर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर रोजी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या परिषदेला उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू, लोकसभा आणि परिषदेचे अध्यक्ष ओम बिर्ला, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.