कच्छ मधील धोरडो इथल्या महिला संतांच्या शिबिरात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त होणाऱ्या कार्यशाळेला पंतप्रधान आज सायंकाळी 6 वाजता संबोधित करणार आहेत. समाजातील महिला संतांची भूमिका आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान या विषयावर कार्यशाळेत चर्चा होणार आहे. 500 पेक्षा अधिक महिला संत या कार्यशाळेत सहभागी होत आहेत.
या कार्यशाळेत संस्कृती, धर्म, महिला उन्नयन, महिला सुरक्षा, महिलांचे भारतीय समाजातील स्थान आणि भूमिका, इत्यादी विषयांवर चर्चा होईल. केंद्र व राज्य सरकारांनी महिलांसाठी राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना, तसेच महिलांनी गाजवलेल्या असामान्य कर्तृत्वाबद्दलही या कार्यशाळेत चर्चा होणार आहे.
या कार्यशाळेत केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी, केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती व डॉ भारती पवार सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाला साध्वी ऋतांबरा, महामंडलेश्वर कनकेश्वर देवी, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.