पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता भारत मंडपम, प्रगती मैदान येथे श्रील प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. महान अध्यात्मिक गुरू श्रील प्रभुपाद जी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान तिकीट आणि नाणे जारी करतील.
आचार्य श्रील प्रभुपाद हे गौडीया मिशनचे संस्थापक होते, ज्यांनी वैष्णव पंथाच्या मूलभूत तत्त्वांचे जतन आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. गौडिया मिशनने श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीचा आणि वैष्णव पंथाचा समृद्ध आध्यात्मिक वारसा जगभर प्रसारित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यामुळे ते हरे कृष्णा चळवळीचे केंद्र बनले आहे.