पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या सोहळ्यानिमित्ताने एका विशेष टपाल तिकीटाचेही प्रकाशन पंतप्रधान करणार आहेत
आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखाली एकूण आठ संस्थांनी मिळून बहुसंस्था सहयोगी प्रकल्प म्हणून विकसित केलेल्या 5G टेस्ट बेडचा शुभारंभ पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान, करणार आहेत.
आयआयटी दिल्ली,आयआयटी हैदराबाद,आयआयटी मुंबई, आयआयटी कानपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी (CEWiT) या संस्थांचा या प्रकल्पात सहभागी झालेल्या संस्थांमध्ये समावेश आहे.या प्रकल्पास विकसित करण्यासाठी 220 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. हा टेस्ट बेड भारतीय उद्योग आणि स्टार्टअप कंपन्यांसाठी त्यांची उत्पादने, रचना, उकलसामुग्री आणि गणनविधी, 5G आणि भविष्यातील तंत्रज्ञानात प्रमाणित करण्यात एक सहाय्यक परिसंस्था निर्माण करण्यात उपयुक्त ठरेल.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची स्थापना 1997 मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिनियम,1997 द्वारे करण्यात आली आहे.