पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारीला, नवी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सैन्य दलाच्या तिन्ही दलांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
यावेळी पंतप्रधान गार्ड ऑफ ऑनर स्वीकारतील आणि एनसीसी छात्रांच्या संचलनाची पाहणी करतील.यावेळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंदही पंतप्रधान घेणार आहेत.